मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

Sunday, June 16, 2013

शिक्षणाचा खेळखंडोबा थांबवणे शक्य आहे.



व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या समावेशाने शिक्षाणाची घसरण थांबेल

लीना मेहेंदळे
केसरी दि. २०.०५.९६

पुणे : सध्याच्या अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करुन त्यात व्यावसायिक शिक्षणाचा अंतर्भाव केला तर शिक्षणाचा खेलखंडोबा निश्च्िातपणे थांबवता येईल, अशी आशा जमाबंदी आयुक्त लीना मेहेंदळे यांनी रनिवारी वसंत व्याख्यानमालेचे २९ वे पुष्प गुफंताना सांगितले.

शिक्षणाचा खेळखंडोबा थांबविता येईल काय या विषयावर मेहेंदळे बोलत होत्या. सतरा-अठरा वर्षें शिक्षण घेतल्यानंतर आपल्याकडील करुण नोकरीसाठी लायक होतो ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. तरुणांना व्यावसायिक शिक्षण देऊन चार-पाच वर्षांत त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

जग ज्या वेगाने पुढे सरकत आहे त्या वेगाने अभ्यासक्रमात बदल करणे अपेक्षित आहे. मात्र आपण अभ्यासक्रमात बदल केल्यानंतर त्याची अंमलबजावणी दोन वर्षांनंतर करतो तेव्हा अभ्यासक्रमात आणखी बदल होणे अपेक्षित असते, असे मेंहेदळे म्हणाल्या. आपल्या देशात शिक्षण या विषयावर मुलांचा फार वेळ वाया जातो. सरकारला आपण आवश्यक तेवढेच शिक्षण देण्याचा आग्रह धरला पाहिजे. दरवर्षी अंदाजपत्रकात शिक्षणासाठी पंधरा टक्कयांपेक्षा जास्त तरतूद केलेली असते तरीहि आपल्या देशात सुमारे ५८ टक्के जनता निरक्षर आहे, असे त्या म्हणाल्या. लोकसंख्येच्या केवळ एक टक्का व्यक्ति पदवीधर आहेत. आत्यंतिक गरिबी हेच शाळंतील गळतीचे प्रमुख कारण आहे. पहिल्या इयत्तेसाठी विद्यार्थीं शाळेत नाव नोंदवतात, मात्र यातून इयत्ता दुसरीत ३० टक्के, चौथील ६० टक्के, वीत८० टक्के विद्यार्थी गळतात. इयत्ता अकराबीत फक्त दहा टक्के विद्यार्थी प्रवेश घेतात, त्यातील एक टक्का विद्यार्थी पदवीपर्यंत शिकतात, ही आपल्या देशातील शिक्षणाची शोकांतिका आहे, असे त्या म्हणाल्या.

दूरदर्शन हे सरकारी माध्यम फक्त जाहिरातींद्वारे पैसे कमावण्याचे साधन बनले आहे. त्यातून शैक्षणिक कार्यक्रंमांचे हवे तेवढे प्रसारण होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

'दहीवी बारावीची परीक्षा सुखरुन पार पाडल्याशिवाय आयुष्यात मोक्षप्राप्त्िा नाही' असा समज आपण करुन घेतल्यामुळे या परीभांना अवास्तव महत्व प्राप्त झाले आहे. दहानी-बारावीच्या पेपरची फेरतापासणी करावयाची असल्यास, 'गुणांची बेरीज परत केली जाईल, पण पेपरची फेरतपासणी केली जाणार नाही हे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत मंडळाचे धोरण अत्यंत चुकीचे असल्याचे मेहेंदळे यांनी सांगितले.

शिक्षणाचा हा खेळखंडोबा सर्वांनी संघडितरीत्या अनिष्ट गोष्टींविरुद्ध आवाज उठवल्यास थांबू शकेल, असे मेहेंदळे म्हणाल्य, प्रस्ताविक अविनाश कुलकर्णी यांनी केले आभार खं. तुं केसकर यांनी मानले.






व्यावसायिक शिक्षणावरील भर आता वाढविण्याची गरज

सकाळ दि. २०.०५.९६

पुणे, ता. १९ : शिक्षणाची हेळसांड थांबविण्यासाठी पुस्तकी शिक्षणाची वर्षे कमी करुन व्यावसायिक शिक्षणावर भर दिला पाहिजे, असे मत राज्याच्या जमावबंदी आयुक्त डॉ. लीना मेहेंदळे यांनी आज येथे वसंत व्याख्यानमालेत व्यक्त केले.

'शिक्षणाचा खेलखेडोबा थांबविता येईल को?' या विषयावर त्या बालेत होत्या, थांबविता येईल, असा विश्र्वास सुरवातीलाच व्यक्त करुन त्या पुढे म्हणाल्या, 'आपण दहावी आणि बारावीचे महत्व अकारण वाढविले आहे. सध्या देशातील ४८ टक्के जनता दारिद्रयरेषेखाली आहे. शिक्षणात गळतीचे प्रमाण प्रचंड आहे. पहिली ते दहावीपर्यंत १० टक्के गळती होते. त्यात मुळींचे प्रमाण मोठे आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेशसाठी 'कॅपिटेशन फी' आकारणे यासारख्या गोष्टींमुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात.'

'शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा मोलाचा वेळ जातो. शिक्षण पूर्ण करण्यासाठी एका विद्यार्थ्याला १२ ते १५ वर्ष घालविणे देशाला परडणारे नाही. एवढे होऊनही या शिक्षणामुळे मुले स्वतःच्या पायावर उभी राहू शकत नाहीत. यासाठी शिक्षणाचा कालावधी कमी करून व्यावसायिक शिक्षणावर भर दिला पाहिजे. मुलांना रोजीरोटी कमविण्याची क्षमता देणारे मध्यम पातळीवरील तांत्रिक शिक्षण देण्याची गरज आहे. ग्रामीण भागातही याकडे जास्त लक्ष दिले गेले  पाहिजे. दूरदर्शन या माध्यमाचा उपयोग शिक्षणासाठी जास्त वेळ करण्याची आवश्यकता असून, त्यासाठी सरकारने प्रयोजक शधले पाहिजेत,' असे त्या म्हणाल्या. पेपर फुटणे, फेरतपासणी, कॅपिटेशन फी किंवा शिशुवर्गात प्रवेशासाठी मुलाखती घेणे याबाबत शासनाच्या प्रशासनाकडे निर्णय घेण्याची क्षमता होती, परंतु प्रशासनाने निर्णय घेतले नाहीत, अशी खंत व्यक्त करून त्या म्हणाल्या, की शिक्षणाची सर्वत्र हेळसांड होत असली, तरी गेल्या काही वर्षांतील लोकजागतीमुळे जो बदल घडला आहे त्यामुळे शैक्षणिक सुधारणा होण्यास वाव आहे, असे वाटते. एखाद्या गोष्टीविरुद्ध लोकांनी संघटितपणे आवाज उठविल्यावर शासनाला त्याची दखल घ्यावी लागते. हे सिद्ध झाले आहे. शिक्षणावर खर्चही भरपूर केला जातो, परंतु अपेक्षित यश मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु, शासनाने केवळ महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या कार्यक्रम हाती घेतला, तरी मोठा फरक पडेल, असा विश्र्वास श्रीमती मेहेंदळे यांनी व्यक्त केला.









शिक्षणक्षेत्रातील अपप्रवृत्तींविरुद्ध संघटित प्रयत्नांची गरज
लीना मेहेंदळे
लोकसत्ता दि. २०.०५.९६

पुणे, दि. ११ - शिभणक्षेत्रातील आजच्या अपप्रवृत्तींविरुद्ध संघटितरीत्या आवाज उठावला, तर बदल होऊ शकतो, हे सिद्ध झाले असल्यामुळे या क्षेत्रातील खेळखंडोबा थांबू शकतो, असे आशावादी विचार प्रशासकीय अधिकारी लीना मेंहेंदळे यांनी मांडले.

'शिक्षणाचा खेळखंबोडा थांबविता येईल का,' या विषयावर वसंत व्याख्यानमालोत आज श्रीमती
वसंत व्याख्यानमाला
मेहेंदळे यांचे व्याख्यान झाले. श्री. अविनाश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक, तर श्री. खं. तु केसकर यांनी आभार प्रदर्शन केले.

शिक्षणक्षेत्रातील विविध समस्या श्रीमती मेहेंदळे यांनी प्रारंभी मांडल्या, छोटया-छोटया निर्णयांसाठी शासकीय अधिका-यांकडे लोकांना हेलपाटे मारावे लागतात, महत्वाच्या परीक्षांचे पेपर फुटतात, प्रवेशासाठी 'कॅपिटेशन फी' द्यावी लागते आणि उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी करता केवळ गुणांची बेरीज तपासली जाते. अशा अनुभर्वामुळे पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा या क्षेत्रावरील विश्र्वास उडून जातो, असे त्या म्हणाल्या.

शाळामधील विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण ही चिंतेची गोष्ट आहे, असे सांगून दहावी, बारावीपर्यंत शिक्षण घेऊनही त्या शिक्षणाची बाजरातील आजची किंमत शून्य असल्यामुळे शिक्षणपद्धतीचाच पुनर्विचार करावा लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

कॅपिटेशन फी विरुद्ध पालकांनी न्यायलयात दाद् मागितल्यानंतर एका ठराविक मर्यादेबाहेर अशी फी घेता येणार नाही, असा निर्णय न्यायालयाने दिला. दहाविच्या फेरपरीक्षांच्या निर्णयाविरुद्ध संघटितरीत्या आवाज उठविण्यात आल्यानंतर तो निर्णय सरकारला बदलावा लागला, अशी उदाहरणे पाहिल्यानंतर मनात आशावाद जागा राहतो, असे त्यांनी सांगितले.

अभ्यासक्रमात सर्वप्रथम आमूलाग्र बदल करावेत आणि व्यावसायिक शिक्षणाचा उपयोग अभ्यासक्रमात करावा, अशी सूचना त्यांनी केली.