मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

Sunday, July 21, 2013

चरखा प्रयोगावरील वृत्त -- लोकपत्र

चरखा प्रयोगावरील वृत्त -- देशोन्नती   झुंजार नेता लोकपत्र



चरखा प्रयोगावरील वृत्त -- झुंजार नेता

चरखा प्रयोगावरील वृत्त -- देशोन्नती   झुंजार नेता,  लोकपत्र




चरखा प्रयोगावरील वृत्त -- देशोन्नती

चरखा प्रयोगावरील वृत्त -- देशोन्नती   झुंजार नेता,  लोकपत्र





पुन्हा चरखा -- सुजय लेले लोकसत्ता ८ जुलै २००९ डीटीपी व चित्रप्रत

पुन्हा एकदा चरखा....

-- डॉ. सुजय लेले

एकोणीस जून २००९ चा दिवस होता. दरवर्षीप्रमाणे वारकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. माऊलांची पालखी सासवड मुक्कामाला पोहोचलीं होती. सर्वत्र हरिनामाचा गजर, टाळांचा किणकिण आवाज, भागवत धर्माच्या फडफडणाऱ्या पताका या सर्वांच्या साक्षीने एका इतिहासाची नव्या स्वरूपात पुनरावृत्ती होणार होती. पुन्हा एकदा चरख्याचं चाक कालचक्राला फिरवणार होतं.

मित्रांनों, मला या क्षणाचा साक्षीदार होता आलं, ते माझ्या गुरूस्थानी असलेल्या लीना ताईमुळे. या लीनाताई म्हणजे महाराष्ट्र शासनातील प्रधान सचिव सौ. लीना मेहंदळे. खरं सांगायचं तर आज जर मी एवढे भरभरून लिहीत असलो तरी प्रथम मी थोडा सांशकच होतो. हे एकवेळ मान्य केलं, की गांधीजींनी चरख्याच्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळ लोकांपर्यंत पोहोचवली, स्वदेशीचे महत्व पटवले, पण आता तंत्रज्ञानाच्या जमान्यात हा चरखा कसा बरे टिकाव धरणार? आणि चरख्याचा अट्टाहास खरंच धरावा का? पण केवळ लीनाताईंनी हा मुद्दा उचलून धरला म्हणून व वारी बघण्याच्या उत्सुकतेमुळे मी त्यांच्या बरोबर सासवडला गेलो आणि हळूहळू माझ्या डोक्यातली चक्रं फिरू लागली. माझ्या प्रश्नांना उत्तरे मिळू लागली. मोठी माणसे आपल्या कृतीतून उत्तरे देतात याचा प्रत्यय येऊ लागला. हा अनुभव मला मिळाला पालखीच्या सासवड मुक्कामात.

वारीला लाखो माणसं जात असतात. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर राज्यांतूनही वारीला भक्तगण येतात. वारीमध्ये ज्याप्रमाणे विठ्ठलाची ओढ आहे, त्याचप्रमाणे प्रबोधन घडवण्याचे सामर्थ्यही आहे. जर या लाखो माणसांच्या हातात चरखा दिला तर त्यातून मिळणाऱ्या धाग्यातून हजारो मीटर वस्त्र तयार होऊ शकेल. पण आता प्रश्न पडतो की वारीमध्ये सूत का कातायचं? याचं कारण म्हणजे धर्माबरोबर कर्म करायचं म्हणजे कर्मालाही ईश्वरी अधिष्ठान लाभतं. वारीत तयार झालेले वस्त्र जर पांडूरंगाला अर्पण केलं व त्याचा प्रसाद म्हणून स्वीकार केला तर वेगळाच आनंदही मिळेल एक वारकरी चरखा चालवताना बघून दुसऱ्यालाही आपण चरखा चालवावा असं वाटेलं. यातून स्वदेशीचा प्रचारही होईल. याचा अर्थ हा नव्हे, की चरखा फक्त वारीतच चालवावा. गावात जाऊन सूत कताई केली तर उत्तमच पण सुरवात वारीपासून. वारकरी नेहमीच कांदा- मुळा भाजीबरोबर विठ्ठलाच नाव घेतो. वारीत असतानाही चरितार्थाचा विचार सोडत नाही. वारीच्या मार्गावर अनेक ठिकाणी गाई- गुरांचे बाजार भरतात. हे वारकरी वारी मार्गावर बी- बियाणांची व शेती-अवजारांची खरेदी करतात. त्यात आता चरख्याचीही जोड देता येईल.

पण आधी म्हटल्याप्रमाणेच माहिती तंत्रज्ञानाच्या युगात चरखा खरंच उपयुक्त आहे का याचं उत्तर होय अस आहे. कारण आजसुद्धा अनेक गावांत वीज नाही, अनेक गावांपर्यंत पक्के रस्ते पोचले नाहीत, प्रगतीचा ओघ समप्रमाणात विस्तारलेला नाही. शहरात मोठी सूतिकागृहे आहेत पण गावामध्ये सुईणींचे महत्व आपण नाकारू शकत नाही तसाच हा मुद्दा. जोपर्यंत शिक्षण, तंत्रज्ञान, योग्य भांडवल समप्रमाणात सर्व भारतभर पसरत नाही तोपर्यंत आपल्याला चरख्यासारख्या जुन्या वाटणाऱ्या गोष्टींना नाकारता येणार नाही.

इथे एक गोष्ट मी नमुद करू इच्छितो, की चरखा चालवण्यामागे प्रती स्वीकारण्याचा अवास्तव अट्टाहास नाहीये, तर एक व्यावहारिक दृष्टिकोन आहे. चरख्यावर कातलेल्या धाग्यापासून बनवलेले वस्त्र हे इको- फ्रेन्डली असतं. लीनाताई अस म्हणतात, की मिलमधे एक मीटर कापड तयार होण्यासाठी सत्तर लीटर पाणी लागत, पण हातमागावर कापड तयार करताना पाणी लागत नाही. आपण जर जास्तीत जास्त सुती कपडयाचा वापर केला तर विदर्भातील आर्थिक संकट दूर होण्यास मदत होईल. मी आधुनिकतेच्या विरोधात नाही. पण जिथे आधुनिक यंत्र व तंत्र वापरणे आर्थिकदृष्टया शक्य नाही तिथे आपल्याला अशी सुलभ तंत्रे वापरली पाहिजेत.

मी थोडं पुढे जाऊन असेही म्हणेन की, कॉम्प्युटर वा मोबाईलवर वेगवेगळे गेम्स खेळून टाईमपास करण्यापेक्षा मुलांना चरखा चालवणे खेळ म्हणून शिकवले तर खूप फायदा होईल. चरखा चालवण्यामध्ये प्रचंड एकाग्रता लागते. जरा जरी लक्ष विचलित झाले तर धागा तुटतो. चालवण्यामध्ये हात, चरखा स्थिर ठेवण्यामध्ये पाय व डोळे यांच्यात सुसूत्रता लागते. मला असं वाटतं की हे सर्व अभ्यासासाठीही उपयुक्त आहे.

ज्ञानेश्वरांनी हरिपाठामध्ये असे म्हटले आहे

संताचे संगती मनोमार्ग गती, आकलावा श्रीपती येणे पंथे.

वारीमध्ये जाऊन ईश्वराचे किती आकलन झाले हे मला माहीत नाही, पण संत प्रवृत्तीच्या व्यक्तीबरोबर थोडा काळ राहिल्यामळे चरख्याचे तत्वज्ञान काही प्रमाणात समजले आणि जे समजले ते मी इथे व्यक्त केले.

---------------------------------------------------------------