मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

Sunday, June 16, 2013

शिक्षणाचा खेळखंडोबा थांबवणे शक्य आहे.



व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या समावेशाने शिक्षाणाची घसरण थांबेल

लीना मेहेंदळे
केसरी दि. २०.०५.९६

पुणे : सध्याच्या अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करुन त्यात व्यावसायिक शिक्षणाचा अंतर्भाव केला तर शिक्षणाचा खेलखंडोबा निश्च्िातपणे थांबवता येईल, अशी आशा जमाबंदी आयुक्त लीना मेहेंदळे यांनी रनिवारी वसंत व्याख्यानमालेचे २९ वे पुष्प गुफंताना सांगितले.

शिक्षणाचा खेळखंडोबा थांबविता येईल काय या विषयावर मेहेंदळे बोलत होत्या. सतरा-अठरा वर्षें शिक्षण घेतल्यानंतर आपल्याकडील करुण नोकरीसाठी लायक होतो ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. तरुणांना व्यावसायिक शिक्षण देऊन चार-पाच वर्षांत त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

जग ज्या वेगाने पुढे सरकत आहे त्या वेगाने अभ्यासक्रमात बदल करणे अपेक्षित आहे. मात्र आपण अभ्यासक्रमात बदल केल्यानंतर त्याची अंमलबजावणी दोन वर्षांनंतर करतो तेव्हा अभ्यासक्रमात आणखी बदल होणे अपेक्षित असते, असे मेंहेदळे म्हणाल्या. आपल्या देशात शिक्षण या विषयावर मुलांचा फार वेळ वाया जातो. सरकारला आपण आवश्यक तेवढेच शिक्षण देण्याचा आग्रह धरला पाहिजे. दरवर्षी अंदाजपत्रकात शिक्षणासाठी पंधरा टक्कयांपेक्षा जास्त तरतूद केलेली असते तरीहि आपल्या देशात सुमारे ५८ टक्के जनता निरक्षर आहे, असे त्या म्हणाल्या. लोकसंख्येच्या केवळ एक टक्का व्यक्ति पदवीधर आहेत. आत्यंतिक गरिबी हेच शाळंतील गळतीचे प्रमुख कारण आहे. पहिल्या इयत्तेसाठी विद्यार्थीं शाळेत नाव नोंदवतात, मात्र यातून इयत्ता दुसरीत ३० टक्के, चौथील ६० टक्के, वीत८० टक्के विद्यार्थी गळतात. इयत्ता अकराबीत फक्त दहा टक्के विद्यार्थी प्रवेश घेतात, त्यातील एक टक्का विद्यार्थी पदवीपर्यंत शिकतात, ही आपल्या देशातील शिक्षणाची शोकांतिका आहे, असे त्या म्हणाल्या.

दूरदर्शन हे सरकारी माध्यम फक्त जाहिरातींद्वारे पैसे कमावण्याचे साधन बनले आहे. त्यातून शैक्षणिक कार्यक्रंमांचे हवे तेवढे प्रसारण होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

'दहीवी बारावीची परीक्षा सुखरुन पार पाडल्याशिवाय आयुष्यात मोक्षप्राप्त्िा नाही' असा समज आपण करुन घेतल्यामुळे या परीभांना अवास्तव महत्व प्राप्त झाले आहे. दहानी-बारावीच्या पेपरची फेरतापासणी करावयाची असल्यास, 'गुणांची बेरीज परत केली जाईल, पण पेपरची फेरतपासणी केली जाणार नाही हे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत मंडळाचे धोरण अत्यंत चुकीचे असल्याचे मेहेंदळे यांनी सांगितले.

शिक्षणाचा हा खेळखंडोबा सर्वांनी संघडितरीत्या अनिष्ट गोष्टींविरुद्ध आवाज उठवल्यास थांबू शकेल, असे मेहेंदळे म्हणाल्य, प्रस्ताविक अविनाश कुलकर्णी यांनी केले आभार खं. तुं केसकर यांनी मानले.






व्यावसायिक शिक्षणावरील भर आता वाढविण्याची गरज

सकाळ दि. २०.०५.९६

पुणे, ता. १९ : शिक्षणाची हेळसांड थांबविण्यासाठी पुस्तकी शिक्षणाची वर्षे कमी करुन व्यावसायिक शिक्षणावर भर दिला पाहिजे, असे मत राज्याच्या जमावबंदी आयुक्त डॉ. लीना मेहेंदळे यांनी आज येथे वसंत व्याख्यानमालेत व्यक्त केले.

'शिक्षणाचा खेलखेडोबा थांबविता येईल को?' या विषयावर त्या बालेत होत्या, थांबविता येईल, असा विश्र्वास सुरवातीलाच व्यक्त करुन त्या पुढे म्हणाल्या, 'आपण दहावी आणि बारावीचे महत्व अकारण वाढविले आहे. सध्या देशातील ४८ टक्के जनता दारिद्रयरेषेखाली आहे. शिक्षणात गळतीचे प्रमाण प्रचंड आहे. पहिली ते दहावीपर्यंत १० टक्के गळती होते. त्यात मुळींचे प्रमाण मोठे आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेशसाठी 'कॅपिटेशन फी' आकारणे यासारख्या गोष्टींमुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात.'

'शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा मोलाचा वेळ जातो. शिक्षण पूर्ण करण्यासाठी एका विद्यार्थ्याला १२ ते १५ वर्ष घालविणे देशाला परडणारे नाही. एवढे होऊनही या शिक्षणामुळे मुले स्वतःच्या पायावर उभी राहू शकत नाहीत. यासाठी शिक्षणाचा कालावधी कमी करून व्यावसायिक शिक्षणावर भर दिला पाहिजे. मुलांना रोजीरोटी कमविण्याची क्षमता देणारे मध्यम पातळीवरील तांत्रिक शिक्षण देण्याची गरज आहे. ग्रामीण भागातही याकडे जास्त लक्ष दिले गेले  पाहिजे. दूरदर्शन या माध्यमाचा उपयोग शिक्षणासाठी जास्त वेळ करण्याची आवश्यकता असून, त्यासाठी सरकारने प्रयोजक शधले पाहिजेत,' असे त्या म्हणाल्या. पेपर फुटणे, फेरतपासणी, कॅपिटेशन फी किंवा शिशुवर्गात प्रवेशासाठी मुलाखती घेणे याबाबत शासनाच्या प्रशासनाकडे निर्णय घेण्याची क्षमता होती, परंतु प्रशासनाने निर्णय घेतले नाहीत, अशी खंत व्यक्त करून त्या म्हणाल्या, की शिक्षणाची सर्वत्र हेळसांड होत असली, तरी गेल्या काही वर्षांतील लोकजागतीमुळे जो बदल घडला आहे त्यामुळे शैक्षणिक सुधारणा होण्यास वाव आहे, असे वाटते. एखाद्या गोष्टीविरुद्ध लोकांनी संघटितपणे आवाज उठविल्यावर शासनाला त्याची दखल घ्यावी लागते. हे सिद्ध झाले आहे. शिक्षणावर खर्चही भरपूर केला जातो, परंतु अपेक्षित यश मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु, शासनाने केवळ महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या कार्यक्रम हाती घेतला, तरी मोठा फरक पडेल, असा विश्र्वास श्रीमती मेहेंदळे यांनी व्यक्त केला.









शिक्षणक्षेत्रातील अपप्रवृत्तींविरुद्ध संघटित प्रयत्नांची गरज
लीना मेहेंदळे
लोकसत्ता दि. २०.०५.९६

पुणे, दि. ११ - शिभणक्षेत्रातील आजच्या अपप्रवृत्तींविरुद्ध संघटितरीत्या आवाज उठावला, तर बदल होऊ शकतो, हे सिद्ध झाले असल्यामुळे या क्षेत्रातील खेळखंडोबा थांबू शकतो, असे आशावादी विचार प्रशासकीय अधिकारी लीना मेंहेंदळे यांनी मांडले.

'शिक्षणाचा खेळखंबोडा थांबविता येईल का,' या विषयावर वसंत व्याख्यानमालोत आज श्रीमती
वसंत व्याख्यानमाला
मेहेंदळे यांचे व्याख्यान झाले. श्री. अविनाश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक, तर श्री. खं. तु केसकर यांनी आभार प्रदर्शन केले.

शिक्षणक्षेत्रातील विविध समस्या श्रीमती मेहेंदळे यांनी प्रारंभी मांडल्या, छोटया-छोटया निर्णयांसाठी शासकीय अधिका-यांकडे लोकांना हेलपाटे मारावे लागतात, महत्वाच्या परीक्षांचे पेपर फुटतात, प्रवेशासाठी 'कॅपिटेशन फी' द्यावी लागते आणि उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी करता केवळ गुणांची बेरीज तपासली जाते. अशा अनुभर्वामुळे पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा या क्षेत्रावरील विश्र्वास उडून जातो, असे त्या म्हणाल्या.

शाळामधील विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण ही चिंतेची गोष्ट आहे, असे सांगून दहावी, बारावीपर्यंत शिक्षण घेऊनही त्या शिक्षणाची बाजरातील आजची किंमत शून्य असल्यामुळे शिक्षणपद्धतीचाच पुनर्विचार करावा लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

कॅपिटेशन फी विरुद्ध पालकांनी न्यायलयात दाद् मागितल्यानंतर एका ठराविक मर्यादेबाहेर अशी फी घेता येणार नाही, असा निर्णय न्यायालयाने दिला. दहाविच्या फेरपरीक्षांच्या निर्णयाविरुद्ध संघटितरीत्या आवाज उठविण्यात आल्यानंतर तो निर्णय सरकारला बदलावा लागला, अशी उदाहरणे पाहिल्यानंतर मनात आशावाद जागा राहतो, असे त्यांनी सांगितले.

अभ्यासक्रमात सर्वप्रथम आमूलाग्र बदल करावेत आणि व्यावसायिक शिक्षणाचा उपयोग अभ्यासक्रमात करावा, अशी सूचना त्यांनी केली.

  





Sunday, May 12, 2013

हेरंब कुळकर्णी व नीलेश निमकर -- दोन शिक्षण कार्यकर्ते

हेरंब कुळकर्णी व नीलेश निमकर -- दोन शिक्षण कार्यकर्ते


प्रिय हेरंब ,

तुमचे आवाहन मिळाले. असर अहवालाच्या माहिती गोळा करण्याच्या पद्धतीबाबत माझ्या मनात शंका असल्या तरी त्या निमित्ताने मुलांच्या लेखन वाचनाबाबतचा मुद्दा समोर आला हे चांगले झालेअसे मला वाटाते. तुमच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून काही मुद्दे पुढे मांडत आहे. 

 वाचन-लेखन म्हणज़े शिक्षण नव्हे असे म्हणेणे मला नुसते चुकीचे नाही तर दुटप्पीपणाचे  वाटते. औपचारिक शिक्षणाच्या निरूपयोगितेवर 'सप्रमाणचर्चा करणारी मंडळी देखील आपल्या स्वत:च्या मुलांना त्यापासून लांब ठेऊ शकत नाहीत यातच सारे आले. त्यामुळे निदान  औपरिक प्राथमिक शिक्षण हा सर्वांचा हक्क मानला तर तो प्रत्यक्षात आणण्यासाठी योग्य वयात ( साधारण दुसरीच्या शेवटी ) वाचन-लेखनावर उत्तम प्रभुत्त्व येणे अतिशय म्हत्त्वाचे आहे. कारण वाचन-लेखन आणि गणन येणे ही औपचारिक शिक्षणात यशस्वी होण्यासाठीची अटच आहे. वाचन-लेखनाचे हत्यार कमकुवत राहिले की समजेपेक्षा पाठांतराच्या आणि ते ही न जमल्यास कॉपी वगैरे गैर प्रकारांचा आधार घेऊन परिक्षा पास होणे याशिवाय दुसरा पर्याय मुलासमोर उरत नाही.ग्रामीण भागात काम करताना शिक्षकाच्या मदतीने कशीबशी कॉपी करत उत्तर पत्रिका लिहिणारा वर्गच्या वर्ग मी अनेकदा पाहतो. त्यातल्या अनेकांना आपण कॉपी करून काय लिहतो आहोत हे ही समजत नाही. अशा वेळी शहरी मध्यमवर्गीय नजरेतून या 'बेकायदेशीर'  कृत्याचा धिक्कार करायचा का या समस्येच्या मुळापर्यंत जाण्यासाठी आपली नजर बदलायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.मी वैयक्तिक पातळीवर दुसरा पर्याय निवडला आहे.माझ्या या निवडीचे प्रतिबिंब मी पुढे मांडत असलेल्या मुद्द्यांत खचितच पडेल असे मला वाटते. 
 मुलांच्या वाचन-लेखनातील अपयशामागच्या करणांवर आपल्याकडे होणारी चर्चा ही फार वरवरची असते असे माझे मत आहे.थोडेसे खोलात शिरण्याचा प्रयत्न केला तर तर 'तुम्ही फार तांत्रिक विचार करताअसा शेरा ऐकायला मिळून बोलणेच खुंटते असाही माझा अनुभव आहे.तरीही माझे म्हणणे मांडण्याचा प्रयत्न करतो.
1.       लेखी भाषा वाचून समजून घेणे हेभाषा ऐकून समजून घेण्यापेक्षा बरेच वेगळे असते.भाषा ऐकून समजून घेताना आसपासच्या स्थळ-काळाचा संदर्भ, बोलणार्‍या व्यक्तीच्या आवाजातील चढ उतार, व्यक्तीचे हावभाव या सार्‍याची फारच मोठी मदत आपल्याला  होते. वाचून अर्थ लावताना अशी कोणतीच मदत मिळत नाही. शिवाय आपले बोलणे ऐकणार्‍याला  कळते आहे का नाही, याची बरीचशी काळज़ी वक्ता घेत असतो, न समजल्यासारखे वाटले तर पुन्हा सांगतो या सार्‍या सोयी वाचून अर्थ लावताना नाहीत. तिथे अर्थ समजून घेण्याची सगळी जवाबदारी वाचकाची ! त्या मुळे आधी लिहिलेल्या मजकुराचा अर्थ लावयचा आणि तो अर्थ बरोबर आहे का हे यावर सतत लक्ष ठेवाचे अशी गुंतागुंतीची दुहेरी प्रक्रिया वाचताना होत असते. अर्थातच नव्याने वाचन शिकणार्‍या मुलांसाठी आकलनाच्या दृष्टीने मोठी उडी असते. पढना है समझना ही NCERT ने तयार केलेली घोषणा मला पटते. कारण वाचन ही एक अर्थ लावण्याची प्रक्रिया आहे.
2.       परिसरातली भाषा कानावर पडली की मूल आपसुकच ती शिकते. लेखी भाषेचे मात्र तसे नाही. काही तुरळक अपवाद वगळले तर बहुसंख्य मुलांना वाचायला आणि लिहायला शिकवावे लागते असा आपला सर्वांचाच अनुभव आहे. लेखी भाषा हे बोलण्याच्या भाषेचेच एक रूप आहे हे मुलाच्या लक्षात येणे ही फार मह्त्त्वाची पायरी आहे अनेकदा अक्षरे शिकणार्‍या मुलांना ती नेमके काय आणि कशासाठी शिकत आहेत याची जाणीवच नसते. अशा वेळी तो एक निरर्थक पाठांतराचा भाग बनतो. Emergent Literacy  या साक्षरतेशी संबंधित विचारधारेत मुलांची लेखी मजकुराची जाण कशी कशी विकसित होत जाते यावर बरेच काम पाश्चात्य देशात झाले आहे. दुर्दैवाने आपल्या भाषांत असे काम अजूनही मोठ्या प्रमाणावर झालेले नाही. अंकुरती साक्षरता या विषयीचा एक स्लाईड शो शिक्षक अभ्यास मंडळ या क्वेस्ट्च्या Online व्यासपीठावर उपलब्ध आहे. त्यात या विषयी काही चर्चा वाचायला मिळेल. या संकल्पनेचा वापर अगदी अंगणवाडीपासून व्हायला हवा. क्वेस्टच्या कामात आम्ही हा प्रयत्न करत आहोत.
3.       लेखी भाषा हे बोलण्याच्या भाषेचच एक रूप असते. मात्र जिथे मुलांची घरची भाषा व शाळेतील प्रमाण भाषा ( महाराष्ट्रात मराठी ) वेगळी असते तिथे घरच्या भाषेकडून शाळेच्या भाषेर्यंत पोहचण्याचा पूल बांधावा लागतो आणि तो ही घरच्या भाषेबद्दल न्यून गंड तयार होणार नाही याची काळज़ी घेऊन ! आदिवासी भाषा आणि प्रमाण मराठी यात बरेच अंतर असल्याने तिथे शिकवणार्‍या शिक्षक़ांना याची जाणीव असणे फारच म्हत्त्वाचे आहे. मुलांच्या घरच्या भाषेला शिक्षणात आदराचे स्थान देणे फारच गरजेचे आहे.  हे नेमके कसे करायचे या याबाबत काही काम अनुताई वाघ आणि सिंधुताई आंबिके यांनी केले होते. सध्या या दोन्ही भाषांत पूल कसा बांधता येईल यावर क्वेस्ट व प्रगत शिक्षण संस्थेत काही काम चालू आहे मात्र निश्चित ठोस काही सांगण्यासाठी कसलेल्या संशोधकाची आणि पर्यायाने संसाधनांची गरज आहे.
4.       बालसाहित्याची उपलब्धता हा मुलांच्या वाचनलेखनावर प्रभाव टाकणारा एक मह्त्त्वाचा घटक आहे. मराठीचा विचार करता आपण ज्याला बालसाहित्य म्हणतो ते खरेतर कुमार साहित्य असते. नुकतेच वाचायला लागलेल्या मुलांसाठी आपल्याकडे फारशी पुस्तके नाहीत ( एकलव्य ,तुलिका , प्रथम  यांच्यासारखे तुरळक अपवाद वगळता) आणि जी आहेत त्यातील चित्रे, भाषा , विषय सारे काही शहरी मध्यमवर्गीय मुलांच्या भावविश्वातले आहे. ग्रामीण मुलांच्या अनुभवांशी मिळतीजुळती अशी पुस्तके जवळजवळ नाहीतच. केवळ पाठ्यपुस्तकाची पाने वाचून वाचन लेखनावर प्रभुत्त्व येणे अशक्य आहे. आपल्या सर्वांना हे प्रभुत्त्व मिळवता आले यात घरात येणार्‍या पुस्तके , मासिके वर्तमान पत्रे यांचा फार मोठा वाटा आहे . त्यामुळे ग्रामीण मुलांना परवडेल अशा पुस्तकांची बाजारपेठ ( मी हा शब्द पूर्ण विचाराने वापरतो आहे !) विकसित होणे गरजेचे आहे. प्रत्येक शाळेत किमान पेटीतले वाचनालय असणे व शिक्षकांनी त्याचा योग्य तो वापर करणे गरजेचे आहे.
5.       वाचन लेखन कसे शिकवावे यावर विविध दृष्टीकोन दिसतात आपल्याचा विचार करून आरंभिक वाचन लेखन कसे शिकवावे याचे धोरण (केवळ  पाठ्यक्रम वा पाठ्यपुस्तके नव्हेत ) ठरवायला हवे असे धोरण ठरवताना लहानप्रमाणात मात्र सखोल झालेल्या कामाचा अभ्यास करायला हवा.आपल्याकडे अशा कामांची फुटक़ळ म्हणून हेटाळणी करण्यातच लोकांना धन्यता वाटते त्याला काय करणार ?विद्यापीठीय पातळीवर अजून हा विषय अभ्यासाचा आहे असे अपल्याला वाटत नाही. काही दशकांपूर्वी वाचन लेखनाबाबत आपल्यासारखीच  स्थिती अमेरिकेत होती. ती बदलण्यात विद्यापीठीय संशोधन विभागांचे मोठेच योगदान आहे,
6.       आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा.आरंभिक  वाचन-लेखन या विषयातील गुंतागुंतीची कल्पना आपल्या शिक्षकांना आहे का ? त्यांच्या सेवापूर्व वा सेवांतर्गत प्रशिक्षणात ही समज बनावी असा काही प्रयत्न केला जातो का ? याचे उत्तर, नाहीअसेच द्यावे लागेल. या विषयावर वाचायला मराठीत फारसे काही लिखाण नाही. खरेतर डीएडच्या अभ्यास्क्रम निर्मितीच्या वेळी यावर सांगोपांग चर्चा व्हायला हवी. तशी ती होताना दिसत नाही. या अजस्र आणि गुंतागुंतेच्या समस्येवर जादूच्या कांडीसारखा चालणारा उपाय नाही तर दीर्घ्रकालीन नियोजनाची आवश्यकता आहे. शिक्षकांची या विषयाची समज तयार होईल अशा प्रकारचे प्रशिक्षण योजायला हवे. शिक्षकांसाठी चांगल्या वाचन साहित्याची निर्मिती करायला हवी. या दिशेने एक छोटेसे पाऊल म्हणून क्वेस्ट्ने आपल्या मर्यादित ताकदीत काही वाचन साहित्य व विडीओ फिल्म साईट वरून मोफत  उपलब्ध करून दिल्या आहेत तसेच शिक्षक अभ्यास मंडळाच्या व्यासपीठावर चर्चा सुरू केली आहे त्याचा जरूर वापर करावा. वापर-कर्त्याने मूळ स्रोताचा उल्लेख करावा अशी माफक अपेक्षा आहे. पुढे काही लिंक देत आहे त्या जरूर पहाव्यात

कळावे
नीलेश निमकर
शिक्षक अभ्यास मंडळ http://forum.quest.org.in/
आरंभिक वाचन लेखन काही लेख http://www.quest.org.in/translated_resources
आरंभिक वाचन लेखन विडीओ फिल्मस http://quest.org.in/node/271
------------------------------------------------------------------------------------------------------