शिक्षण- व्यवस्था
नवे सहस्त्रक उजाडत असतांनाच देशातील समाज- व्यवस्था बिघडली आहे हे सांगायला कुणा तज्ञ्ज्ञाची गरज उरलेली नाही.
या बिघाडांचे पाढेही आतापर्यंत खुपदा
वाचले गेले आहेत. भरमसाठ फुगलेली आणि फुगत चाललेली जनसंख्या, वाढत चाललेली भीषण
आर्थिक विषमता, भ्रष्टाचार, जात-
प्रांत-धर्म-भाषा यातून वाढत चाललेली
दुफळी आणि समाजमनाचे विभाजन, बहुराष्ट्रीय कंपन्यांचे देशातील आर्थिक आणि राजकीय व्यवहारांभेवती
आवळत चाललेले पाश, शिक्षणक्षेत्रात व्यापून उरलेले. अभाव आणि त्यातून निर्माण
होणारी निरक्षरता प्रचंड बोकाळलेला चंगळवाद, कुप्रशासन,
ब्रेनड्रेन इत्यादी कांही ठळक उदाहरणं सांगत येतील.
यासर्वांत कांही बदल घडवायचा असेल तर तो आपणच करायचा आहे आणि तो शिक्षणाच्या माध्यमानेच होऊ शकतो. पण त्यासाठी आताचे शिक्षण आणि
शिक्षण -तंत्र दोंन्ही कुचकामी ठरलेले आहेत. त्यामधे बदल होणे नितांत गरजेचे आहे. शिक्षण म्हणजे
कांय आणि कशासाठी?
शिक्षण ही एक अखंड चालणारी
प्रक्रिया आहे. आणि श्वास चालतो तोपर्यंत ती चालूच रहाते. पण आपण शिक्षण म्हणतो तेंव्हा ते शाळा-कॉलोजातून
मिळालेल्या, किंबहुना कुणीतरी जाणीव-पूर्वक दिलेल्या शिक्षणाबद्दल बोलतो. असे जाणीवपूर्वक शिक्षण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना देता
यावे म्हणून समाजाने आणि शासनाने केलेली व्यवस्था म्हणजेच शिक्षण व्यवस्था.
कशासाठी शिक्षण या प्रश्नाचा विचार
दोन बाजूंनी करावा लागेल. प्रत्यक्ष
जी व्यक्ति शिक्षण घेत असते. तिला यातून कांय मिळणार आहे आणि ज्या समाजाने ही शिक्षण-व्यवस्था निर्माण
केली, ज्या समाज्यामधे त्या व्यक्तीला पुढेही रहायचं आहे , त्या समाजाला कांय मिळणार आहे.
व्यक्तिगत उद्दीष्ट- शिक्षण घेण्याने
शिक्षण घेणा-याला कांय मिळाले पाहिजे? सर्वप्रथम शिकणे म्हणजे कांय? कसे शिकायचे, कुणाहीकडून पटंकन ज्ञान कसे हस्तगत करायचे ही दृष्टि आली पाहिजे. चौकस बुद्धि निर्माण झाली पाहिजे.
शिकण्याची आस लागली पाहिजे.
त्याची गोडी व आवड, लागली पाहिजे. शिकण्याविषयी,
निरनिराळ्या विषयांबाबत मनात औत्सुक्य,
आसुसलेपणा, आणि शिकून घेण्याची सचोटी निर्माण झाली पाहिजे. थोडक्यांत
शिक्षण हा छंद झाला पाहिजे.
*शिक्षणाने शिकण्याचा छंद जडला पाहिजे.
देह
टिकवण्यासाठी पोटाला भाजी भाकरी मिळालीच पाहिजे. ती कमावण्यासाठी पात्रता
शिक्षणातून मिळायला हवी. ती नेमकी
येत नसल्याने आजचे शिक्षण कुचकामी वाटते.
तशीच ही पात्रता वर्षानुवर्ष शिक्षणात न
घालवता लौकरांत लौकर निर्माण झाली
पाहिजे. इतर कशालाही वेळ लागला तरी पोटार्थी शिक्षण कमीत कमी वेळात मिळाला पाहिजे.
(अपूर्ण)
No comments:
Post a Comment