मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

Monday, April 20, 2015

बाबासाहेब यांचे विचारधन

डॉ. बाबासाहेब यांचे विचारधन

🚩ज्या भूमीने व्यास, कपिल, कणाद, गौतम, चार्वाक, महावीर आणि बुद्ध यांच्यासारखे श्रेष्ठ तत्त्ववेत्ते निर्माण केले आणि बोैद्ध धर्मासारखी उदात्त देणगी जगाला दिली, त्या या थोर भूमीचा मी दूत आहे आणि तिचा तो श्रेष्ठ वारसा चालविण्याची जबाबदारी माझ्यावर आहे। मी महाराष्ट्रीय नाही किंवा महारही नाही. मी भारतीय आहे आणि माझ्या या जन्मभूमीचे पांग फेडण्यातच माझ्या जीवनाचे सार्थक आहे.

👉ब्राह्मणांशी माझे काही वैर नाही। माझा विरोध दुसऱ्यांना हीन समजण्याच्या द्‌ुष्प्रवृत्तीला आहे. भेदभाव मानणाऱ्या ब्राह्मणेतरांपेक्षा नि:पक्ष वृत्तीचे ब्राह्मण मला अधिक जवळचे वाटतात. आपल्या आंदोलनात सहकार्य देणाऱ्या अशा ब्राह्मणांना मी दूर लोटू शकत नाही.

📌आज जरी आम्ही राजकीय, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वेगवेगळ्या गटांत विभागले गेलो तरी मला खात्री आहे की, अनेक जाती-पंथ असूनदेखील आम्ही "एक राष्ट्र' म्हणून उभे राहू। एक दिवस असाही येईल की, फाळणीची मागणी करणाऱ्या मुस्लिम लीगला पण "अखंड हिंदस्थान'च आपल्या हिताचा वाटू लागेल.

📎माझे सामाजिक तत्त्वज्ञान हे निश्चितपणे तीन शब्दांत गुंफले जाण्याचा संभव आहे। ते शब्द म्हणजे स्वातंत्र्य, समता व बंधुभाव. तथापि, हे माझे तत्त्वज्ञान फें्रच राज्यक्रांतीपासून मी उसने घेतले असे कोणीही समजू नये. माझ्या तत्त्वज्ञानाची मुळे धर्मात आहेत, राज्यशास्त्रात नाहीत. माझा गुरू बुद्ध, याच्या शिकवणुकीपासून ते मी काढले आहे.

💪जगण्याचे अनेक मार्ग आहेत, पण ते सारेच सारख्या मान्यतेचे आहेत असे नाही। शत्रू आला असता, त्यावर चाल करून त्याचा पाडाव करणे हा जगण्याचा एक मार्ग आहे. तसेच त्याला शरण जाऊन तो घालील त्या अटींवर जगणे हा जगण्याचा दुसरा मार्ग आहे. दोहोंपैकी कोणत्याही मार्गाने गेले असता जगणे होतेच, पण एका परीचे जगणे हे दुसऱ्या परीच्या जगण्यापेक्षा फार निराळ्या तऱ्हेचे असते. एक मानवाचे जिणे आहे, तर दुसरे किड्याचे जिणे आहे.

✒देशाच्या राज्यकारभारात प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्षरीतीने भाग घेऊन तो आपल्या ध्येयास अनुकूल बनविल्याशिवाय कोणत्याही गांजलेल्या वर्गास आपली दु:खे दूर करता येणार नाहीत। दुसरा कोणी आपल्या हिताकरिता काही करील, या आशेवर जर गांजलेला व पिळला गेलेला वर्ग विसंबून राहील, तर तो तोंडघशी पडल्याशिवाय राहणार नाही.

📍आपल्याला ज्या मार्गाने जावयाचे आहे, तो मार्ग चिरस्थायी असावा। जो मार्ग अराजकतेकडे जातो, जो जंगलाकडे नेतो, असा मार्ग अनुसरण्यात काही अर्थ नसतो. जो मार्ग आपणास आपल्या इसिप्त ध्येयाप्रद सुरक्षित पोचवितो, जो आपले जीवन बदलवितो, असा मार्ग कितीही लांबचा असला तरी तो जवळच्या मार्गापेक्षा निश्चितच श्रेयस्कर असतो.

🔴कार्ल मार्क्स अगर कम्युनिस्ट-कम्युनिझमचे ध्येय साध्य करण्याकरिता म्हणजेच गरिबी निवारण्यासाठी, खाजगी मालमत्ता नष्ट करण्यासाठी विरोधकांची हत्या करणे, त्यांना ठार मारणे हे साधन वापरू इच्छितात आणि येथेच बुद्धिझम आणि कम्युनिझममधील मूलभूत फरक आहे। भगवान बुद्धाचे मार्ग लोकांना हिंसेपासून परावृत्त करण्याचे, युक्तिवादाने पटवून देण्याचे, नैतिक शिकवण देण्याचे व ममतेचे आहेत. कम्युनिस्ट पद्धती ही पाशवी शक्तीवर आधारलेली आहे. कम्युनिस्ट पद्धती रशियन लोकांनी राजीखुषीने स्वीकारलेली नाही. त्यांनी ती भीतीमुळे स्वीकारलेली आहे. यादृष्टीने पाहिले तर बुद्धिझम शुद्ध लोकशाहीवादी आहे. अभ्यासू वृत्तीने बुद्धिझम व कम्युनिझमचा दीर्घकाळ अभ्यास करून मी या ठाम निर्णयास आलो आहे की, मनुष्यमात्राचे दु:ख निवारण्यासाठी जो बुद्धाने उपदेश केला आहे व जी पद्धती सांगितली आहे, ती अतिशय सुरक्षित व पक्की आहे.

?🍅🌽शेतकऱ्यांच्या दारिद्र्याचे प्रत्यक्ष कारण जमिनीची लहान-लहान तुकड्यांनी होणारी विभागणी हे असून, त्यामुळे तिथे हे भांडवल गुंतवण्यास व सुधारलेल्या पद्धतीने शेती करण्यास वाव मिळत नाही। जमिनीचे तुकडे व त्यामुळे शेतकरीवर्गात वावरणारे दारिद्र्य याचे मुख्य कारण म्हणजे वाढत्या लोकसंख्येला केवळ जमिनीवरच अवलंबून राहावे लागते हे होय आणि जमिनीवर अवलंबून राहणाऱ्या जादा लोकसंख्येच्या पोषणाची शेतीव्यतिरिक्त इतर व्यवसायात तजवीज लावल्यावाचून शेतकऱ्यांचे दारिद्र्य हटणार नाही. म्हणून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी व त्यांची उत्पादनशक्ती वाढविण्यासाठी उद्योगधंद्यांची वाढ करणे हे मुख्य साधन आहे. चालू उद्योगधंद्यांचे पुनरुज्जीवन आणि कच्च्या मालाच्या अनुरोधाने नव्या उद्योगांची निर्मिती या दोन्हींची आवश्यकता आहे.

💂हिंदी मुसलमानदेखील एक अजब चीज आहे। सर्व सामाजिक सुधारणेचे त्याला वावडे आहे. हिंदुस्थानाबाहेरील त्याचे धर्मबंधू समाजक्रांतीवादी बनले आहेत. राष्ट्राच्या व मानवी जीवनाच्या सामाजिक प्रगतीला अडथळा करणाऱ्या सर्व चालीरीतींचा मुस्ताफा केमाल पाशासारख्या मुसलमान देशभक्ताने धुव्वा उडवून दिला आहे, पण हिंदी मुसलमानांना मौ. शौकतअल्लीसारख्या देशभक्त व राष्ट्रीय हिंदी मुसलमानांनादेखील केमालपाशा व अमानुल्ला आवडत नाहीत. कारण ते सुधारक आहेत आणि हिंदी मुसलमानांच्या धार्मिक दृष्टीला सुधारणा हे तर महत्पाप वाटते.

💰🏭पाश्चिमात्य राष्ट्रे पौर्वात्य राष्ट्रांकडे चढेल दृष्टीने पाहतात, ह्याचे कारण त्यांचे आर्थिक नि औद्योगिक बळ हेच होय. यास्तव माझे असे मत आहे की, भारताची जेव्हा आर्थिक नि औद्योगिक शक्ती वाढेल, तेव्हा साम्राज्यवाद नि काळ्या-गोऱ्यांचे वाद हे मिटतील.
माझी दैवते तीन आहेत। पहिले दैवत विद्या होय. विद्येशिवाय माणसाला शांतता नाही आणि माणुसकीही नाही. दुसरे दैवत विनय होय. मी कोणाची याचना केली नाही. माझे ध्येय असे आहे की, माझं पोट भरलं पाहिजे आणि माझ्या लोकांची सेवा केली पाहिजे. माझे तिसरे दैवत म्हणजे शील होय. माझ्या आयुष्यात मी दगाबाजी, फसवणूक, आत्मसिद्धीकरिता पाप केलंं असं मला आठवत नाही. शीलसंवर्धन हा गुण माझ्यात मोठ्या प्रमाणात आहे, हे सांगायला मला फार अभिमान वाटतो.

🌞प्रस्तुतच्या लेखकाने समाजकार्याप्रीत्यर्थ जेवढा स्वार्थत्याग करणे त्यास शक्य होते, तेवढा स्वार्थत्याग त्याने केला। तो काही संस्थानिक नाही की जहागीरदारही नाही. काही झाले तरी द्रव्यानुकूलता नसता इंग्रज सरकारने देऊ केलेली दरमहा अडीच हजार रुपयापर्यंत वाढू शकणारी नोकरी त्याने नको म्हणून सांगितली. वकिलीसारख्या स्पृश्य लोकांवर अवलंबून असणाऱ्या धंद्यात विशेष किफायत मिळण्याची आशा नसताही केवळ समाजकार्य करण्यास मोकळीक असावी म्हणून त्याने तो मार्ग पत्करला आहे. रूढ धर्माचारातील आणि लोकाचारातील दोषांचे निर्भयपणे आविष्करण करण्याचे भयंकर कार्य हाती घेतले असल्यामुळे, देशाभिमानी व धर्माभिमानी म्हणविणाऱ्या पत्रांकडून होत असलेला शिव्यांचा व शापांचा भडिमार तो एकसारखा सोशित आहे. कवडीचा फायदा नसताना त्याने एक वर्षाच्या आत "बहिष्कृत भारता'चे बऱ्यावाईट रीतीने रकाने भरून काढून लोकजागृतीचे काम केेले व ते करताना त्याने आपल्या प्रकृतीकडे, सुखाकडे, चैनीकडे व ऐषारामाकडे न पाहता डोळ्यांच्या वाती केल्या.

🇮🇳मी प्रथम भारतीय आहे. मी तापट आहे. सत्ताधारी लोकांशी माझे अनेक खटके उडाले, राजकीय संघर्ष झाला, पण हे आमचे कौटुंबिक भांडण आहे. म्हणून मी परदेशात भारताबद्दल कडवट बोलणार नाही. देशहित प्रथम. मी माझ्या देशाशी कधीही द्रोह करणार नाही.
अस्पृश्यता ही मूर्तिमंत असमानता आहे। एवढी मोठी असमानतेची जागती ज्योत कोठेच दिसावयाची नाही. एका माणसाला दुसऱ्या माणसाने त्याला न शिवण्याइतका पतित लेखण्याची प्रथा हिंदू धर्माखेरीज व हिंदू समाजाखेरीज कोठेही सापडेल काय? ज्याच्या स्पर्शाने पाणी बाटते, ज्याच्या स्पर्शाने देव बाटतो, तो प्राणी मानवाच्या कोटीत गेला आहे असे कोणी म्हणेल काय? एवढा कलंक तुमच्या शब्दाला, तुमच्या शरीराला आहे.

🚩धर्माची आवश्यकता गरिबांना आहे। पीडित लोकांना धर्माची आवश्यकता आहे. गरीब मनुष्य जगतो तो आशेवर. जीवनाचे मूळ आशेत आहे. ही आशाच नष्ट झाली तर जीवन कसे होईल? धर्म आशावादी बनवितो व पीडितांना, गरिबांना संदेश देतो- "काही घाबरू नकोस, जीवन आशावादी होईल.

🐍ब्रिटिशसत्ता स्थिरावल्यापासून भारतात गेल्या शतकात एकंदर एकतीस दुष्काळ पडले व त्यात सुमारे अडीच ते तीन कोटी लोक भुकेने मेले. याचे कारण असे की, आपल्या देशात उद्योगधंदे व व्यापार यांची वाढ होऊ द्यायची नाही व हिंदुस्थानातील व्यापारी पेठा सदैव खुली राहावी, असे ब्रिटिश राज्यकारभाराचे बुद्धिपुरस्सर धोरण आहे. ब्रिटिशांनी सुधारलेली विधिपद्धती आणि सुव्यवस्था ह्यांची देणगी हिंदुस्थानास दिली ही गोष्ट खरी. तथापि मनुष्य केवळ विधीवर आणि सुव्यवस्थेवर जगत नाही, तर तो अन्नावरही जगतो.
तरुणांची धर्मविरोधी प्रवृत्ती पाहून मला दु:ख होते। काही लोक म्हणतात, धर्म ही अफूची गोळी आहे, परंतु ते खरे नाही. माझ्या ठायी जे चांगले गुण वसत आहेत, ते किंवा माझ्या शिक्षणामुळे, समाजाचे जे काही हित झाले असेल ते माझ्यासाठी असलेल्या धार्मिक भावनेमुळेच होय. मला धर्म हवा आहे. धर्माच्या नावाने चाललेला ढोंगीपणा नको.

🌷राजकारण कोणास करावयाचे असेल, तर राजकारणाचा चांगला अभ्यास केला पाहिजे। आपल्या समाजातील प्रत्येक कार्यकत्यार्ंने राजकीय, धार्मिक आणि आर्थिक या सर्व प्रश्नांचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे. ज्यांना पुढारी व्हायचे असेल, त्यांनी पुढाऱ्यांची कर्तव्यकर्मे व जबाबदारी काय आहे, याचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे.

📎सत्तेचे राजकारण खेळण्यासाठी किंवा एखाद्या मंत्र्याची जागा रिकामी झाली असता ती आपणाकडे ओढून घेण्याची प्रधानमंडळातील सभासदात जी जिवापाड धडपड चालू होई, त्यापासून मी पूर्णपणे अलिप्त राहत असे। मूकावस्थेत राहून सेवा करणे हेच श्रेष्ठ कर्तव्य होय, असा माझा विश्वास आहे.

📍मार्क्स वाचून काही कामगार पुढारी असे गृहीत धरतात की, भारतात मालक आणि नोकर असे केवळ दोनच वर्ग आहेत आणि भांडवलशाही नष्ट करण्याची आपली मोहीम ते सुरू करतात। या दृष्टीत दोन ढोबळ चुका आहेत. जी बाब संभवनीय आहे किंवा आदर्श आहे, तिला वास्तविक म्हणण्याची पहिली चूक ते करतात. सर्व समाजातील माणसे अर्थ प्रवृत्तीचे, बुद्धिवादी किंवा न्यायप्रिय आसतात, हे म्हणणे जसे खोटे, तसेच सर्व समाजात केवळ दोनच वर्ग असतात, असे समजणेही खोटे आहे. भारतात असे सापेक्षपणे निश्चित असे दोन वर्ग अस्तित्वात नाहीत.

🔫💣हिंसेच्या शक्तीला शरण जाऊन मिळविलेली शांतता ही खरी शांतता नव्हे, ती आत्महत्या होय। तसे करणे म्हणजे सुखी, सुंदर आणि स्वास्थ्यपूर्ण जीवन जगण्यासाठी जे काही उदात्त आणि आवश्यक असते, त्याची होळी करून रानटीपणाला व अनाचारीपणाला शरण जाण्यासारखे आहे.

🚩मला बोैद्धधर्मही आवडतो, कारण कुठल्याही धर्मात जी तीन तत्त्वे सापडत नाहीत, ती बौद्धधर्मातच सापडतात. बौद्धधर्म मला प्रज्ञा शिकवतो. तो मला अंधश्रद्धा नि अद्‌भुतता शिकवीत नाही. तो मला प्रज्ञा, करुणा आणि समता ही तीन तत्त्वे शिकवतो. देव किंवा आत्मा समाजाचा उद्धार करू शकत नाही. मार्क्सवाद आणि साम्यवाद यांनी जगाचे सर्व धर्म हादरून टाकले आहेत. बुद्ध हाच कार्ल मार्क्सला पूर्ण उत्तर आहे. रशियन साम्यवादाचा उद्देश रक्तरंजित क्रांती घडवून आणणे हा आहे. बुद्धप्रणित साम्यवाद हा रक्तहीन क्रांती घडवून आणतो.

#डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त

Sunday, April 12, 2015

शिक्षण- व्यवस्था सुधाराची दिशा

                                शिक्षण- व्यवस्था

                नवे सहस्त्रक उजाडत असतांनाच देशातील समाज- व्यवस्था बिघडली आहे हे  सांगायला कुणा तज्ञ्ज्ञाची गरज उरलेली नाही. या बिघाडांचे  पाढेही आतापर्यंत खुपदा वाचले गेले आहेत. भरमसाठ फुगलेली  आणि फुगत  चाललेली जनसंख्या, वाढत चाललेली  भीषण  आर्थिक  विषमता, भ्रष्टाचार, जात- प्रांत-धर्म-भाषा यातून  वाढत चाललेली दुफळी आणि  समाजमनाचे  विभाजन, बहुराष्ट्रीय कंपन्यांचे  देशातील आर्थिक  आणि  राजकीय व्यवहारांभेवती आवळत  चाललेले पाश,  शिक्षणक्षेत्रात व्यापून  उरलेले. अभाव आणि  त्यातून  निर्माण होणारी  निरक्षरता  प्रचंड बोकाळलेला चंगळवाद, कुप्रशासन, ब्रेनड्रेन  इत्यादी कांही ठळक  उदाहरणं सांगत येतील.
                     यासर्वांत कांही बदल घडवायचा असेल तर तो आपणच करायचा आहे आणि  तो शिक्षणाच्या  माध्यमानेच  होऊ  शकतो. पण त्यासाठी आताचे शिक्षण  आणि  शिक्षण -तंत्र दोंन्ही कुचकामी ठरलेले आहेत. त्यामधे  बदल होणे नितांत गरजेचे आहे. शिक्षण म्हणजे कांय आणि कशासाठी?
                      शिक्षण ही एक  अखंड चालणारी प्रक्रिया आहे. आणि  श्वास चालतो  तोपर्यंत ती चालूच रहाते.  पण आपण शिक्षण  म्हणतो तेंव्हा ते शाळा-कॉलोजातून  मिळालेल्या,  किंबहुना कुणीतरी  जाणीव-पूर्वक दिलेल्या  शिक्षणाबद्दल  बोलतो. असे जाणीवपूर्वक शिक्षण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना देता यावे म्हणून समाजाने आणि शासनाने केलेली व्यवस्था   म्हणजेच शिक्षण  व्यवस्था.
                 कशासाठी शिक्षण या प्रश्नाचा विचार  दोन बाजूंनी करावा लागेल. प्रत्यक्ष  जी व्यक्ति शिक्षण  घेत असते.  तिला यातून कांय मिळणार आहे आणि ज्या  समाजाने ही शिक्षण-व्यवस्था  निर्माण  केली, ज्या समाज्यामधे त्या व्यक्तीला पुढेही  रहायचं आहे , त्या समाजाला कांय मिळणार आहे.
                व्यक्तिगत उद्दीष्ट- शिक्षण घेण्याने  शिक्षण घेणा-याला कांय मिळाले पाहिजे? सर्वप्रथम शिकणे  म्हणजे कांय? कसे  शिकायचे, कुणाहीकडून पटंकन ज्ञान कसे  हस्तगत करायचे ही दृष्टि आली पाहिजे.  चौकस बुद्धि निर्माण झाली पाहिजे.  शिकण्याची  आस लागली पाहिजे. त्याची गोडी व आवड,  लागली पाहिजे. शिकण्याविषयी, निरनिराळ्या विषयांबाबत मनात  औत्सुक्य, आसुसलेपणा, आणि शिकून  घेण्याची   सचोटी निर्माण झाली पाहिजे.  थोडक्यांत  शिक्षण हा छंद झाला पाहिजे.
                   *शिक्षणाने शिकण्याचा छंद जडला पाहिजे.
     देह टिकवण्यासाठी पोटाला भाजी भाकरी मिळालीच पाहिजे. ती  कमावण्यासाठी  पात्रता शिक्षणातून मिळायला हवी. ती  नेमकी येत  नसल्याने  आजचे शिक्षण  कुचकामी  वाटते.  तशीच ही पात्रता वर्षानुवर्ष शिक्षणात न  घालवता लौकरांत लौकर निर्माण  झाली पाहिजे. इतर कशालाही वेळ  लागला तरी  पोटार्थी शिक्षण  कमीत कमी वेळात मिळाला पाहिजे.
(अपूर्ण)










Friday, March 13, 2015

Brahmanism

jvg1992@yahoo.com  writes ---- 

My intention is to provide content for debate against Anti-Bhramanism. The article was written by Uday Lal Pai in 2007.


Those who historically murdered, looted, raped and pillaged and destroyed are today forgiven in modern India in the name of forgetting the past. What’s more those who destroyed our cultural heritage, universities of cosmic wisdom and architectural wonders are provided with all luxuries and comforts in India. But Brahmins, who historically dedicated their lives for the sake of dharma and the welfare of the society, are still persecuted in modern India for their falsely alleged sins of the past.

Indian Brahmins, we are taught by the modern historians, have been oppressing the lower caste population in India. Brahmins are described as cunning, parasitic exploiters and creators of the iniquitous caste system. The theory of “5000 years of Brahmin oppression” is used to include every other caste in the backward classes list and religion, provide them unrestrained reservation and justify that.

This story is repeated so loudly and so frequently that it is also treated as the truth.

Much scholarship and intellectual labor was put into this thesis before it acquired its present momentum and currency. Anti-Brahmanism was a construct of the last two centuries.

They say Brahmins never allowed others to read and write. The word “Brahmin” reminds every one of arrogant, dis-respective, communal and abusive extremists who whip the lower caste people or Dalits till they die. That’s a vivid picture that paints your mind when you hear that word. The anti-Brahmin movement gained momentum when leftists, priests and religious leaders from hostile religions, separatists and casteists of different hues took this from Britishers.

Academia has always held the position that Brahmins exploited and continue to exploit everyone else, that they authored the Hindu scriptures just to ensure their own highest position in the social hierarchy, and that they are responsible for so many problems in India.

But these arguments lack historical validity and logical consistency. It is merely a case of “repeat a lie a hundred times and it will become the truth”.

– Let’s think without any inhibitions and conditions. Make your intelligence and thinking unbiased and open to accept the reality. Let’s look at real facts founded upon truth. Should we lend our thinking facility to others?

– If you have an open mind and if you can think with clarity and logically, you would understand that 95% of Bhramins were innocents and gentle. It is amazing to see that how fiction can become truth in the course of time. You don’t need big brain to make out that anti-Brahmin story was planned and planted by hostile religious invaders, colonialist and missionaries of conversion and by politicians to keep the public blind and at the same time rob Indians off everything.

The fact is that Brahmins were neither rich nor powerful at any point of time in history. They are not the Samurais of India. Every animal in the forest wants to hunt deer and eat them. The Indian Brahmins are like deer (stag) in the forest. Indian Brahmin community has become like Jews of Nazi times. Is this acceptable? The destitution of Hindu Brahmins has moved none, not even the parties known for Hindu sympathy.

For many past centuries, mostly Christians and Muslims were ruling India. Do we have to blame Brahmins for everything that went wrong in India? Brahmins have never ruled India.

Brahmins were always poor class! They never ruled India!

-Can you quote any historical evidence to prove that Brahmins were kings or ruled any Indian kingdom? (Chanakya had helped Chandragupta Maurya to build a united India. After becoming the emperor of India, Chandragupta fell at the feet of Chanakya and requested him to be Rajaguru and stay in the palace with all luxuries. Chanakya’s reply: ” I am a Brahmin. My karma is to teach students and live on what they get by the way of begging. So I am going back to my village.”)

Can you find any single instance or story of rich Brahmins in history or in the mythology (purana)? Which purana mentions about a rich Brahmin? The story of Sudama (Kuchela), the poor Brahmin, is a well-known episode from Lord Krishna’s life. Incidentally, Krishna (the most popular deity of Hindus) belonged to the Yadava sub-caste. The Yadavas are currently enumerated amongst the Other Backward Castes (OBCs) in India.

– If Brahmins were as arrogant as they picturized to be, how come they worship Gods from lower caste? Lord Shiva (Highest Hindu God) is often termed as a Kirata in the Puranas. The Kiratas would currently fall in the Scheduled Tribes (ST) category in modern India. Krishna (see above paragraph) was an OBC.

To be able to oppress others requires positions of power. The Brahmin’s traditional occupation was that of a temple priest or purohit officiating religious functions. Their sole income was Biksha (alms) given by the landlords (non-Brahmins). And another section of Brahmins were teachers (guru) without salary. Were those the most powerful positions?

– And have you forgotten the term: ‘Garib Brahmin’ (=Poor Brahmin). Pick up any Indian storybook, you will see that term quoted as a virtue. The highest stature of the society was occupied by the Brahmin ascetics and their only way of survival was alms given by people. [Of course there are exceptions, but it cannot be denied that poor Bhramins were honored. Brahmins were asked to live at a minimum and devote themselves to pursue knowledge. Ref: Alvin Toffler, an American writer and futurist, “Hinduism propagated poverty as a virtue.”]

As a matter of fact, most of the oppression of Dalits (lower caste Hindus) was committed by the land-owning class (Zamindars) and not by Brahmins. OBCs also oppressed the Dalits. But Brahmins became the scapegoat.

– Do you know the priestly class among Brahmins is only less 20% of Brahmin population? Some of them might have been greedy or villains, as the priests or clergy in any other community/religion. (However, in the small state of Kerala, Namboodiri Brahmins were rich due to a different socio-political system.) But they never had the power that clergy of other religions enjoy.

Nobody asked non-Brahmins not to read. Brahmins by and large are in pursuit of knowledge. This made them powerful (not in material way). This stems jealousy among others. Whose fault is it anyway?

– If the reading and writing was confined to Brahmins or if education were open only to the Brahmins then how do you have Valmiki composing Ramayana or Thiruvalluvar composing Thirukkural? Or the numerous works on bhakti by non-Brahmin bhakti saints etc? Brahmins never prevented others from learning. Please note that Ved Vyas who edited four vedas and wrote Mahabharata was born to a fisher-woman.

– Even if you look at people Vashishtha, Valmiki, Krishna, Rama, Buddha, Mahavira, Tulsidas, Kabir, Vivekananda none of them were Brahmins. Are these not the people whose teachings we consider most valuable? If none of them were Brahmins why cry so much about Brahmin didn’t allow you to learn?

-The most powerful of the dharma shaastra is the Manusmriti written by Manu. It is the only scripture that gives Brahmins a high status. But Manu was not a Brahmin – he was a Kshatriya. Gita, that describes caste system, was written by Vyasa, who was born to a backward caste fisherwoman. All ancient literature gives highest position to Brahmins, because of the virtue and ethics they upheld.

Brahmins were the seat of non-violence!

-The poor hapless Brahmins were beheaded by Arabian invaders, crucified in Goa by the Portuguese Inquisition, vilified by British missionaries, and morally crucified today by their own brothers and sisters. Did anybody fight back?

Aurangzeb massacred 150,000 Brahmins and their families in Benares, Ganga gnat, Haridwar, etc…He made a mountain of skulls of the Hindu Brahmins and their children which was visible from 10 miles away. Aurangzeb has gone on record , making a pile of Brahmin “janeoos” (holy thread) and making a bonfire of them (after decapitating innocent Hindu Brahmins who refused to convert to Islam. Did any Brahmin fight back?

-The brutal and fanatic barbarians from Portugese mercilessly persecuted and killed millions of Konkani Brahmins who refused to get converted, in Konkan-Goa. Can you show me a single example of a G.S.Brahmin killing a Portuguese?

(When the Portuguese came to India, St. Xavier wrote to the king of Portugal, his patron, “If there were no Brahmins, all pagans would be converted to our faith.” He hated them with a hatred that evangelists alone are capable of. He called them a “most perverse people.” Brahmins became a persecuted people. Thousands of Konkani Brahmins (Gaud Saraswat Brahmins) were persecuted and left Goa. They lost everything. Was there any GS Brahmin to fight back?)

-The foreign invaders killed thousands and thousands of – Sarawat Brahmins – in Kashmir and Gandhara desa-regions-(part of today’s Afghan-Pakistan included) area. There is no sarawat Brahmin in these regions now. Can you quote a single incident of a saraswat killing an invader? Let alone killing, any violent act from sarawats?

(Pundits, the original inhabitants of Kashmir were tortured and driven out of their dwellings in Kashmir by Islamic militants trained in Pakistan. Genocide of Kashmiri Pundits has reached its climax with terrorism succeeding in ‘CLEANSING’ the valley of this ancient ethno-religious community. To escape persecution, more than 500,000 Kashmiri pundits had to leave their homes in the Valley and out of that; more than 50,000 are still languishing in uninhabitable refugee camps in Jammu and Delhi. Militants killed a lot of pundits and raped their women. Can you show me a single pundit who involved in violence to fight back?)

-Dr. Ambedkar, the father of Indian constitution, quoting Muslim historians, says the first act of religious zeal by Mohammad bin Qasim, the first Arab invader, was circumcision of Brahmins. “But, after they objected, he put all above the age of seventeen to death.” During invasions, forced conversions and Mughal periods, hundreds and thousands of Brahmins were beheaded. Can you show a single instance of a Brahmin killing a human being in any other religions?

In early 19th century, Tipu Sultan’s army descended in Melkote on a Deepavali day and massacred 800 citizens, mostly of a sect known as Mandyam Iyengars. Sanskrit scholarship had been their forte. [To this day Melkote does not celebrate Deepavali]. That slaughter rendered Melkote a near ghost town. Its environmentally connected life was broken, kalyanis – water retaining structures- went to ruin, water shortage became endemic, and the hills went brown. Sanskrit lost a home.

In fact the non-violent Brahmins were pure Vegetarians and eat Satvik food which does not instigate them to do any crime. Brahmins never ever defended themselves.

Please reflect upon today’s pathetic state of Brahmins!

-Did you also know that most rickshaw pullers in Banaras are Brahmins? Did you know that you also stumble upon a number of Brahmins working as coolies at Delhi’s railway stations? 50 per cent of Patel Nagar’s (New Delhi) rickshaw pullers are Brahmins.75 per cent of domestic help and cooks in Andhra Pradesh are Brahmins. There is no reason to believe that the condition of Brahmins in other parts of the country is different. The percentage of Brahmins that live below poverty line is almost 60.

Thousands of Brahmins kids immigrating to US for jobs and they make good software engineers or scientists. Why didn’t the government of India think about such brain drain that too when India lacks manpower?

– The per capita income of various communities as stated by the Karnataka state finance minister in the state assembly sometime back: Christians Indian Rupees (Rs) 1,562, Vokkaligas Rs 914, Muslims Rs 794, Scheduled castes Rs 680, Scheduled Tribes Rs 577 and Brahmins Rs 537.

At Tamil Nadu’s Ranganathaswamy Temple, a priest’s monthly salary was Rs 300 (Census Department studies) and a daily allowance of one measure of rice some time ago. The government staff at the same temple receive Rs 2,500 plus per month. But these facts have not modified the priests’ reputation as ‘haves’ and ‘exploiters.’

Even if we agree hypothetically what we had learnt under the colonial-missionary-communist aegis that Brahmins were oppressors, can a civilized society accept the way politicians behave with Brahmins? If your forefather had committed a crime why should you be punished?

Some Brahmins certainly would have manipulated caste system – just the way they do in political parties or religious groups. It may be true that the past is not a clean tale for entire Brahmin community. A minority Brahmins hands may have covered in blood as it can be. And yes, it’s a closed community who doesn’t allow easily outsiders inside their homes and don’t maintain any sort of interactive relationships outside the community.

But should we generalize the whole community for the mistakes done by a small section among them? Didn’t we forgive those foreign invaders from Arabia who killed hundreds and thousands of Indians and destroyed entire ancient culture and looted the rich India? (Remember India was the richest nation before foreign invaders reached here)

How long do we stereotype people? Why the hatred? An eye for an eye will make the whole world blind.

Being a Brahmin in India seems to be a double-edged sword. If a Brahmin succeeds, then his entire caste will be perceived as privileged and not in need of assistance. But if a Brahmin commits any aberrant deed, his faults will be projected onto his entire community, leading to more public condemnation of the entire Brahmin caste. The moment Brahmins were able to do something about it, the whole society turns and gangs up on them to prevent them from getting what they deserve claiming that Brahmins suppressed them in the past – as if as miniscule and non-violent a community as the Brahmins could have kept these horrors away from wealth and power or anything leading to it.

The world has a very short memory. The world has forgotten the contribution made by Brahmins to our society. It was not just learning Vedas, Maths, Astronomy and political science, but the sacrifice they have done for entire human kind by developing Ayurveda, Pranayama, Kamasutra, Natyasastra and Yoga. If Brahmins were selfish, they would have patented all those things.
If Brahmins were selfish, they would have put at least their byline below those thousands of ancient scripts. Brahmins sacrificed their life for the well being of human being with a single motto that: “Loka Samastha Sukino Bhavantu” (May all the beings in all the worlds be happy)

In turn, the world is trying to crucify them, for no fault of them.

The intended or actual meaning of Brahmin is one who has knowledge about Brahman, the ultimate and impersonal divine reality of the universe from which all being originates and to which it returns.

The very concept of Brahmanism is so noble and attractive that it is time that we decided to keep it above dispute. There have always been deliberate attempts to confuse the concept of Brahmanism with the caste of Brahmins in India.

Let us understand the simple fact that all members of the Brahmin caste are NOT Brahmins. Similarly, all Brahmins need not necessarily belong to the Brahmin caste.

There are four type of Brahmanism (1) Brahmana – one who is born to brahmana parents, (2 Dvijaha – one who has received the samskaras starting from garbhadhana, (3) Vipraha – one who has received knowlege and (4) Shrotriyaha – one who has all the above qualities.

– Going by our classics and epics, it is very clear that the original Brahmins were definitely the ones that would command respect in any society. Brahmanism had a clear belief that the knowledge is power in the real sense. Brahmacharya which means a discipline followed with specific purpose of understanding the senses and thus taking control of the senses.

Brahmanism also wanted that the peace should be all encompassing, all creatures and all belief systems and all regions.

I am not supporting caste system, the real meaning of which is disappeared now. Our ancestors wanted to create a knowledge-based society in the name of Brahmin, that’s gone now. Alas! A huge majority of Brahmins turned to be non-vegetarians now. And I know in the name of Brahmanism some illiterate people who cannot pronounce rituals and mantras correctly performing pooja and other religious activities and making money only.

Modern Brahmins having abandoned their traditional way of life and being cut off from their traditions, suffer from an unjustified guilt complex and have swallowed this suppression propaganda uncritically. Caught between the greed of the masses, the unscrupulousness of the politicians and the malice of the real exploiters, they are persecuted mercilessly in modern India.

Are Brahmins not humans? Don’t Brahmins desire comforts, luxury and wealth for themselves and their near and dear ones, the way all people do?

Monday, March 2, 2015

झाडा-पानांचा व बियांचा संग्रह -अरविंद यादव-सांगली उपक्रम

अरविंद यादव लिहितात 27 -02-2015
मेहेंदळे महोदया,
मागच्या वर्षी २८ फेब्रुवारी २०१४ च्या विज्ञान दिना निमित्ताने आपण सावरकर प्रतिष्ठान या शाळेत आला होतात. या वेळी आपण आपल्या भाषणात मुलाना एक आवाहन केले होते. वृक्ष निरीक्षण करुन झाडांच्या पानांचा व बियांचा संग्रह करुन, त्याचा उचित अभ्यास करुन प्रकल्प तयार करावा.
आमच्या शाळेतील सहा विद्यार्थानी या विषयावर माहे ऑगस्ट, २०१४ पासून कामाला सुरवात केली होती. हे प्रकल्प आतां पूर्ण झाले आहेत. आज दि. २४--२०१५ रोजी आमच्या शाळेतील विज्ञान शिक्षक श्री. यशवंत जाधव ज्यानी या मुलांना मार्गदर्शन केले यानी मला दाखवले. हे प्रकल्प मी दोन तास बघत होतो. हे प्रकल्प पाहिल्या नंतर या मुलांनी ७ ते ८ महिने यावर खूपच मेहनत घेऊन आभ्यासपूर्ण काम केल्याचे जाणवले. कु. प्राजक्ता जामसांडेकर या इ. ९ वी तील विद्यार्थीनीने केलेला प्रकल्प कांही किरकोळ त्रुटी सोडल्यातर उत्तम केला आहे. या प्रकल्पाच्या प्रस्तावनेत तिचे प्रेरणास्थान आपण असल्याचे लिहीले आहे.
हे प्रकल्प आपणास दाखविण्याची या मुलांची ईच्छा व्यक्त केली आहे. यासाठी काय योजना करावी या विचारात मी आहे. आपण सेवा निवृत्त झाल्याचे फेसबुक वरुन समजले. मग आपले वास्तव्य सद्या कोठे आहे, हे समजल्यास कांही योजना करता येईल. सांगलीला कधि जवळपास येणार असलात तर तसे कळवावे म्हणजे समक्ष हे प्रकल्प आपणास दाखता येतील.

या वर्षातील शेवटचे गणित विषयावरील एक कार्यशाळेचे आयोजन दि. २७--२०१५ रोजी सांगलीच्या बी,एड्‌. महाविद्यालयात करण्यात आले आहे. गणित शिक्षक व बी.एड्‌. महाविद्यालयातील विद्यार्थी याचा यात समावेश असणार आहे