मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

Monday, March 2, 2015

झाडा-पानांचा व बियांचा संग्रह -अरविंद यादव-सांगली उपक्रम

अरविंद यादव लिहितात 27 -02-2015
मेहेंदळे महोदया,
मागच्या वर्षी २८ फेब्रुवारी २०१४ च्या विज्ञान दिना निमित्ताने आपण सावरकर प्रतिष्ठान या शाळेत आला होतात. या वेळी आपण आपल्या भाषणात मुलाना एक आवाहन केले होते. वृक्ष निरीक्षण करुन झाडांच्या पानांचा व बियांचा संग्रह करुन, त्याचा उचित अभ्यास करुन प्रकल्प तयार करावा.
आमच्या शाळेतील सहा विद्यार्थानी या विषयावर माहे ऑगस्ट, २०१४ पासून कामाला सुरवात केली होती. हे प्रकल्प आतां पूर्ण झाले आहेत. आज दि. २४--२०१५ रोजी आमच्या शाळेतील विज्ञान शिक्षक श्री. यशवंत जाधव ज्यानी या मुलांना मार्गदर्शन केले यानी मला दाखवले. हे प्रकल्प मी दोन तास बघत होतो. हे प्रकल्प पाहिल्या नंतर या मुलांनी ७ ते ८ महिने यावर खूपच मेहनत घेऊन आभ्यासपूर्ण काम केल्याचे जाणवले. कु. प्राजक्ता जामसांडेकर या इ. ९ वी तील विद्यार्थीनीने केलेला प्रकल्प कांही किरकोळ त्रुटी सोडल्यातर उत्तम केला आहे. या प्रकल्पाच्या प्रस्तावनेत तिचे प्रेरणास्थान आपण असल्याचे लिहीले आहे.
हे प्रकल्प आपणास दाखविण्याची या मुलांची ईच्छा व्यक्त केली आहे. यासाठी काय योजना करावी या विचारात मी आहे. आपण सेवा निवृत्त झाल्याचे फेसबुक वरुन समजले. मग आपले वास्तव्य सद्या कोठे आहे, हे समजल्यास कांही योजना करता येईल. सांगलीला कधि जवळपास येणार असलात तर तसे कळवावे म्हणजे समक्ष हे प्रकल्प आपणास दाखता येतील.

या वर्षातील शेवटचे गणित विषयावरील एक कार्यशाळेचे आयोजन दि. २७--२०१५ रोजी सांगलीच्या बी,एड्‌. महाविद्यालयात करण्यात आले आहे. गणित शिक्षक व बी.एड्‌. महाविद्यालयातील विद्यार्थी याचा यात समावेश असणार आहे

No comments:

Post a Comment