२००८ वर्षी मी इ. ११ वी विज्ञान शाखेचा प्रवेश अर्ज मराठीतून असलाच पाहिजे म्हणून जोरदार मागणी केली. त्या मागणीबाबत थोडी खडाजंगी होऊन अखेर ती मागणी २०१० मध्ये मान्य करताना प्रवेश समितीचे अध्यक्ष असलेले प्राचार्य मला म्हणाले, " नुसता अर्ज मराठीत करा म्हणून भांडलात, नियम दाखवलात, पण विज्ञान शिक्षण कोठे मराठीतून मिळते?" या वाक्याने मी निराश झालो नाही, तर ११ वी विज्ञान शाखेचे वर्ग मराठीतून कसे सुरु होतील, याचे प्रयत्न दुसऱ्या दिवसापासून सुरु केले. अनेक इंग्रजीधार्जिण्या पुणेकरांना ही कल्पनाच अगोदर वेडेपणाची वाटली आणि माझी या पुण्यात भरपूर टिंगलटवाळी झाली पण यावर्षी ती कल्पना प्रत्यक्षात उतरली.
वरील वाक्य उच्चारणाऱ्या त्या प्राचार्यांचे आभार ! त्यांची प्रेरणा उपयुक्त ठरून आता माझ्या मागणीवरून आणि पाठपुराव्याने अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) पदविका शिक्षण देखील मराठीतून मिळण्याची सोय झाली. मराठीकाका, अनिल गोरे
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची एक मोठी आवश्यकता पूर्ण करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. तंत्र शिक्षण पदविका अभ्यासक्रम (DME, DEE, DCE वगैरे ) यासह सुमारे २०० हून अधिक पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रम ज्यांना मराठी या प्रगत, समृद्ध, संपन्न भाषेतून शिकायचे असतील, त्यांना ते मराठीतून शिकवण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय आज महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री मा. ना. राजेश टोपे यांनी जाहीर केला. यासाठी लागणारी मराठी पुस्तके आणि मराठीतून शिकणारा शिक्षक वर्ग अल्पकाळात प्रशिक्षित करून राज्यातील विद्यार्थ्यांना प्रगत मराठी भाषेतून तांत्रिक शिक्षण मिळण्यासाठी हजारो शिक्षितांचा सहभाग आवश्यक आहे. यात सहभागी होऊ इच्छिणार्यांनी कृपया माझ्याशी संपर्क साधावा. यात मोठे नाव आणि भरपूर पैसाही मिळणार यात काही शंका नाही. - अनिल गोरे., मराठीकाका.
फार उशीर नाही. अजून तरी ८० % विद्यार्थी मराठी माध्यमाच्या शाळेत जातात आणि
असे निर्णय झाल्यावर आता मराठी मध्यम नाकारण्याची वेळ येणार नाही.
मराठी मध्यामच्या शाळेत मुलांना घालायला निघालेल्या पालकांना " १० वी पुढचे
शिक्षण मराठीत नाही, पुढे काय करशील ?" हा प्रश्न गेली दीडशे वर्ष निरुत्तर
करीत होता. आता असे पालक निरुत्तर होणार नाहीत आणि मोकळेपणाने मराठी माध्यमाची
निवड करू शकतील. - अनिल गोरे, मराठीकाका.
------------------------------------------------------------------------------------------------------
निवेदन
मराठी माध्यमातून इ. ११ वी विज्ञान शाखेसाठी प्रवेश घेण्याचा पर्याय शिक्षण उपसंचालक, पुणे यांनी देशाच्या इतिहासात प्रथमच यावर्षी ११ वी प्रवेश प्रक्रियेत उपलब्ध करून दिला. ११ वी विज्ञान शाखेतील मराठी माध्यमासाठी ८० जागा उपलब्ध असताना हा पर्याय निवडण्यासाठी ८३३ आवेदनपत्रे भरली गेली आहेत. ११ वी विज्ञान शाखेत मराठी माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी ज्यांनी अर्ज केलेले विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे मेळावे समर्थ मराठी संस्था आणि मराठी आयोजित केला जाणार असून अशा विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी विनामूल्य मेळाव्याला येण्यासाठी नावनोंदणी करावी, हे आवाहन ! नावनोंदणीसाठी ११ वी मराठी माध्यम असे लिहून पुढे आपला दूरध्वनी/ भ्रमणध्वनी क्र. तसेच नाव पुढील क्रमांकावर संदेश (SMS) पाठवावा. मेळाव्याची वेळ आणि ठिकाण कळविले जाईल.
संपर्क - मराठीकाका, प्रा. अनिल गोरे. अध्यक्ष - समर्थ मराठी संस्था ७०५ बुधवार पेठ, पुणे ४११०३० भ्र. ९४२२००१६७१. आणि प्रा. विनय र.र. कार्याध्यक्ष मराठी विज्ञान परिषद टिळकस्मारक मंदिर आवार, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०. ९४२२०४८९६७

---------------------------------------------------------------------------------------
सोबतची बातमी लोकसत्ता पण ४ दी. २६ /६/२०२४ या अंकातील आहे.
-शाळेत मराठीतून विज्ञान शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गेली दीडशे वर्षे पुढील विज्ञान शाखेतील शिक्षण घेताना प्रवेशाच्या वेळी विज्ञान शाखेसाठी मराठी माध्यमाचा पर्याय उपलब्ध नसे, म्हणून इच्छा नसतानाही लाखो लोकांनी या शाखेत इंग्रजी माध्यमाला नाईलाजाने प्रवेश घेतला. गेली सात वर्षे मी सरकारकडे पाठपुरावा केला त्याला यश मिळून यावर्षी (जून २०१४) पुणे विभागात मराठी माध्यम विज्ञान प्रवेशासाठी ८० जागा उपलब्ध झाल्या होत्या. त्यासाठी ८३३ अर्ज आले आहेत. या सर्व ८३३ जणांना विज्ञान मराठी माध्यमात प्रवेश मिळावा यासाठी मी आजपासून पाठपुरावा सुरु केला आहे, मराठीप्रेमींनी यासाठी सहकार्य करावे- . या ऐतिहासिक घटनेचे स्वागत आणि शासनाचे आभार !मराठीकाका, अनिल गोरे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
मराठी हे शिक्षणासाठी उत्तम माध्यम आहे. कोणत्याही शिकवणीचे शुल्क भरणे परवडत नसलेले मराठी माध्यमाचे विद्यार्थी इ. १० वी परीक्षेत आपापल्या गावात ९४ - ते ९७ % हून अधिक गुण घेऊन पहिल्या क्रमांकाने यशस्वी झाले.(या यशाची माहिती देणारी मालिका रोज झी मराठीवर दाखवली जाते. ) लाखो रुपयांचे शाळा शुल्क आणि हजारो रुपयांचे शिकवणी शुल्क भरणाऱ्या इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना इतके झळझळीत यश मिळालेले नाही. इंग्रजी माध्यम विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी निराश होऊ नये, इंग्रजी माध्यम निवडून आपण केलेली भयंकर चूक सुधारणे शक्य आहे, हे समजून घ्यावे. चूक सुधारण्यासाठी आजच इ. २ री पासूनची सर्व विषयांची मराठी माध्यमातील पाठ्यपुस्तके घरी आणा आणि आपल्या इंग्रजी माध्यमातील मुलांच्या अभ्यासाची एक उजळणी प्रगत, समृद्ध, संपन्न मराठी भाषेतून करून घ्या. गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल या विषयांबाबत होणारे आपले अपरिमित नुकसान टाळण्याचा हा एकमेव आणि प्रभावी मार्ग महाराष्ट्रातील सर्व मराठी भाषकांनी ( विशेषत: मुलांना आग्रहाने इंग्रजीत माध्यमात घातलेल्या महिला पालकांनी ) अवश्य अनुसरावा, हे आवाहन ! - अनिल गोरे.
अत्यंत आनंदाची आणि महत्वाची बातमी.
पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड विभागाने ११ वी विज्ञान शाखेतील मराठी माध्यमाचे वर्ग सुरु करण्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. गेल्या दोनशे वर्षात शाळेच्या शिक्षणानंतर ११ वी विज्ञान शाखेत मराठी मध्यम घेऊन शिकण्याची सोय नव्हती, ती आता श्रीमती सुमन शिंदे : शिक्षण उपसंचालक , पुणे यांनी उपलब्ध करून दिली आहे. ज्यांना ११ वी विज्ञान (सायन्स) च्या वर्गात सर्व विषय मराठीतून शिकायचे असतील, त्यांनी अर्ज भरताना हा पर्याय निवडावा, हे आवाहन ! महाराष्ट्राचे प्रगतीकडे पडलेल्या या पहिल्या पावलाचे स्वागत करा. मराठीकाका, अनिल गोरे.

ग.रा.पालकर नावाची एक मराठी शाळा आहे, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे येथे... शाळा उत्तम आहे. फार अडचणीतून ही शाळा वरती येत आहे. कालच १०वीचा निकाल लागला त्यात ह्या शाळेचा निकाल १००% लागला आहे. ही शाळा उत्तम आहे हे मी छातीठोकपणे सांगू शकतो. ... ह्या मराठी शाळेच्या काही मुलांना तुमची मदत हवी आहे. वह्या, शैक्षणिक साहित्य अशी ती मदत आहे. . जरूर जरूर संपर्क साधा... मंजिरी जाधव ९७३००३३४१२. अगदी कदाचित वर्गात शिकवत असल्या तर त्या फोन घेऊ शकणार नाहीत, तसं झालं तर पुन्हा प्रयत्न करा आणि शाळेला भेटही द्या. इंग्रजी शाळांच्या फुकाच्या दिमाखात आपणच मराठी शाळांना ताकद दिली पाहिजे... जय महाराष्ट्र! अनिल गोरे.
भारतीय भाषेतून शिकल्याचा प्रचंड लाभ !
राम, शाम यादव नावाचे उत्तर भारतातील दोन बंधू महापालिकेच्या शाळेत हिंदी या भारतीय भाषेत शिकले. ११ वी, १२ वी ला त्यांनी हिंदी या भारतीय भाषेतून भौतिक, रसायन, गणित विषय शिकले. आयआयटी प्रवेश परीक्षेसाठी मार्गदर्शन करणाऱ्या वर्गांचे अफाट शुल्क देण्याची त्यांची ऐपत नव्हती. त्यांनी स्वत:ला समजणाऱ्या हिंदीतून अभ्यास केला आणि या प्रवेश परीक्षेच्या दोन्ही टप्प्यात ४०० व्या क्रमांकाच्या आत क्रमांक पटकावला. इंग्रजीवर १०० % अवलंबून राहिलेले हजारो पुणेकर विद्यार्थी मात्र तुलनेने फार कमी यश मिळवू शकले आहेत. पुण्यातील विद्यार्थ्यांना अधिक यश मिळण्यासाठी भारतीय भाषांमधून अभ्यास आणि प्रवेश परीक्षा हा दुहेरी उपाय उपयुक्त ठरेल. या पद्धतीची उपयुक्तता मी आयआयटी च्या संबंधित अधिकार्यांना पटवून दिल्यावर २०१४ पासून त्यांनी IIT JEE mains ani advance या दोन्ही परीक्षा मराठी या प्रगत, समृद्ध, संपन्न भाषेतून देण्याचा पर्याय उपलब्ध केला आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. - मराठीकाका, अनिल गोरे.

मराठी पाउल आणखी पुढे!
मागासलेली इंग्रजी भाषा आणि दरिद्री रोमन लिपी यामुळे कोणत्याही अभ्यासक्रमातील इंग्रजी पुस्तकांचा अभ्यास करताना मराठीच्या तुलनेत दुप्पट ते पाचपट शब्द आणि तिप्पट ते आठपट अक्षरे वाचणे, लिहिणे, लक्षात ठेवणे भाग पडते. अभ्यासाला अधिक वेळ लागतो, अधिक कंटाळा येतो आणि त्यामुळे विषयाचे आकलन विद्यार्थ्याच्या क्षमतेपेक्षा कमी होते. काही विषयांचा अभ्यास इंग्रजी पुस्तकातून करणे भाग पडत होते कारण संबंधित मराठी पुस्तकेच नव्हती. मी ११ वी, १२ वी विज्ञान शाखेतील भौतिक, रसायन, जीवशास्त्राची मराठी पाठ्यपुस्तके निर्माण केली.
इंग्रजी पुस्तकातून क्षमतेपेक्षा कमी आकलन होणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी शाळेत इंग्रजीतून शिकतानाच ही मराठी पुस्तके वापरून अपेक्षेपेक्षा थोडे अधिक यश मिळवले. १२ वीतील अशा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन !
कालच ही मराठी पुस्तके परेश ठाकूर ७३८३१२५१२३ या सुरतमधील माणसाने पुण्याहून मागविली. गुजरातेतील शाळा, महाविद्यालयात जिथे मागासलेली इंग्रजी भाषा हे माध्यम असले तरी शिक्षक सर्व भाग गुजराती या प्रगत भारतीय भाषेतून समजावून देतात, म्हणून तिथल्या विद्यार्थ्यांना विषय उत्तम कळतात. तिथल्या मराठी विद्यार्थ्यांना या दोन्ही भाषांपेक्षा मराठी अधिक उपयुक्त ठरत असल्याने आता गुजरातेतील मराठी भाषक विद्यार्थी यापुढे मराठी पुस्तकांचाही आधार घेऊ लागली आहेत.
विषय कळत नसला तरी इंग्रजीतून शिकत राहणे हा काही प्रगतीचा चांगला मार्ग नव्हे, तर अधिक चांगले कळण्यासाठी कोणत्याही विषयाशी संबंधित मराठी पुस्तके वाचून अधिक चांगले आकलन करून घेणे हा स्वत:चे भले करण्याचा उत्तम मार्ग आहे. -अनिल गोरे.

मी काल प्रसिद्ध केलेली पेरूगेट भावे शाळा, पुणे येथील स्थितीची माहिती मिळाल्यावर राज्यभरातील तीन प्राध्यापकांनी माझ्याशी संपर्क साधला. ते येत्या जूनपासून त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्येक तासाला जे काही इंग्रजीतून शिकवतील तेच पुन्हा मराठीतून समजावून देणार आहेत. पालकांच्या हव्यासापोटी अधिकृत माध्यम इंग्रजी ठेवून मग मुलांच्या हितासाठी, प्रगतीसाठी अनौपचारिक रीत्या मराठी माध्यम वापरणे ही माझी सूचना त्यांना भलतीच आवडली आहे. चला, त्यांचे अनुकरण करू ! ही पद्धत मी स्वत: गेली अनेक वर्षे वापरत असून त्यामुळे माझ्या विद्यार्थ्यांना मोठे यश मिळाले. 2013 मध्ये IIT - JEE ला पहिला आलेला विद्यार्थी यश भळगट हा इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी माझ्याकडे अशाच प्रकारे शिकला होता. - प्रा. अनिल गोरे.
मराठी माध्यमाचे सामर्थ्य !
पुण्यातील पृथ्वी नावाचा एक शिकवणी वर्ग राज्य आणि केंद्र लोकसेवा आयोग परीक्षांचे मार्गदर्शन वर्ग चालवतो. या वर्गातील तीस जण यंदा राज्य सेवा परीक्षेत यशस्वी झाले. हे सर्वजण १ ली पासून १० वी पर्यंत मराठी माध्यमात शिकले. कोवळ्या वयात मराठी या प्रगत, समृद्ध आणि संपन्न भाषेत शिकल्यामुळे त्यांना असे मोठे यश मिळाले.
शेजारच्या आया - बायांचे अर्धवट ज्ञानाने भरलेले शेरे ऐकून पिडलेल्या काही पालकांनी वीस पंचवीस वर्षापूर्वी आपली मुले इंग्रजी माध्यमात घातली होती, तशी दुर्दैवी मुले देखील या शिकवणी वर्गात तेच प्रशिक्षण घेत होती. १ ली ते १० वी इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या त्यातील कोणालाही असे यश इंग्रजी भाषा या विषयात देखील मिळाले नाही. या दुर्दैवी मुलांनी दोन महिने धडपड करून मराठी भाषेवर पकड मिळवली तर त्यांना पुढची परीक्षा मराठीतून लिहिता येईल शिवाय त्यांची इंग्रजीही सुधारेल आणि त्यांना अधिक यश देखील मिळेल असे वाटते. - मराठीकाका, अनिल गोरे.

गेल्या काही दिवसातील शैक्षणिक माध्यमाबाबतची चर्चा पाहून काही सधन तरुण पालक आपल्या चिमुकल्या तीन वर्षीय मुलांना मराठी माध्यमात घालण्याची इच्छा व्यक्त करू लागले आहेत. मराठीतून ११ वी आणि १२ वी सायन्स चा अभ्यास आणि परीक्षा दोन्ही शक्य आहे हे कळल्यावर संजय गोडबोले या सधन पालकाने २०१० मध्येच आपल्या मुलाला मराठी शाळेत घातले. आपला मुलगा ११ वी ला जाईपर्यंत ११ वी, १२ वी तसेच इंजि/ मेडिकल सह सर्व अभ्यासक्रमात मराठी माध्यम रुजलेले असावे, म्हणून मी निर्माण करत असलेल्या भौतिकशास्त्राच्या पुस्तकासाठी त्यांनी मला २५००० रुपयांचे बेमुदत, बिनव्याजी कर्ज दिले. ते पुस्तक निर्माण झाल्यावर आपले पैसे लगेच परत न घेता त्यांनी मला ते पैसे इतर मराठी पुस्तके निर्माणासाठी वापरायची सूचना केली. आता भौतिकशास्त्र, रसायन आणि जीवशास्त्राची ११ वी, १२ वीची पुस्तके तयार असून आम्ही १ फेब्रु. २०१४ पासून इंजि ची मराठी पुस्तके निर्मितीचा प्रकल्प सुरु करीत आहोत. आता यापुढे नुसता फेसबुक पाठींबा न देता या प्रकल्पात लेखक म्हणून सहभाग घ्यावा हे सर्व तज्ञांना आवाहन ! या सहभागात पैशापेक्षा मराठीतून इंजि च्या विषयांचे लेखनासाठी सहकार्य हवे आहे. - मराठीकाका, अनिल गोरे.
झटपट कळणे हा मराठी भाषेचा अंगभूत गुण असून शक्यतोवर लवकर काहीही न समजणे हा इंग्रजी शब्द समूहाचा अंगभूत विशेष गुण आहे. मराठीच्या या गुणाचा लाभ इंग्रजी माध्यमातील मुलांनाही मिळावा म्हणून मी 'वेगाभ्यास' पद्धती विकसित केल्या आहेत. अधिकाधिक लोकांनी आपल्या भाषिक अंधश्रद्धा बाजूला ठेवून आपल्या मुलांचे भले करून घ्यावे. आपली मुले इंग्रजी माध्यमात एखाद्या इयत्तेत असतील तर त्यांना १ ली पासून त्या इयत्तेपर्यंतची सर्व विषयांची मराठी माध्यमातील पुस्तके आणून द्यावी आणि त्याही पुस्तकांचा नीट अभ्यास करायला लावावा. समृद्ध मराठी भाषेचा स्पर्श मोठे यश मिळवून देऊ शकतो. - मराठीकाका, अनिल गोरे.
११ वी, १२ वी अभ्यासक्रमातील भौतिक(फिजिक्स) रसायन केमिस्ट्री) जीव (बायोलोजी) आणि गणित विषयांच्या प्रश्नपत्रिका १९७७ पासून दरवर्षी मराठीतून काढल्या जातात. मराठीतून उत्तरे लिहिण्याचा पर्याय जे विद्यार्थी परीक्षा अर्जात निवडतात, त्यांना मराठी प्रश्नपत्रिका मिळते, त्यातील प्रश्नांची मराठीत उत्तरे लिहिता येतात. वरील चार विषयांच्या ऑक्टो.2013 मधील प्रश्नपत्रिका ज्यांना पाहायला हव्या असतील त्यांनी कृपया marathikaka@gmail.com या पत्त्यावर आपली मागणी करावी. काही तांत्रिक अडचणीमुळे(अज्ञानामुळे ) मला मी बनवलेला नमुना फेसबुकवर प्रदर्शित करता येत नाही., पण मी कोणालाही त्यांच्या वी पत्त्यावर (इमेलवर) हा संच पाठवून देईन अधिक माहितीसाठी www.samarthmarathi.com वर लेख हा विभाग पहावा. हे तीपण वाचणार्या प्रत्येकाने या मराठी प्रश्नपत्रिका प्रत्येक १२ वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करावा, ही विनंती! -अनिल गोरे.
माझ्या सहा वर्षांच्या प्रयत्नाला यश आले. मुंबई शहरातील चि. प्रणित दबडे हा IIT-JEE साठी मराठी प्रश्नपत्रिकेची मागणी करणारा पहिला विद्यार्थी आहे. मराठी या प्रगत भाषेतून IIT-JEE देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल प्रणितचे अभिनंदन! याच परीक्षेत गुजराती भाषेत प्रश्नपत्रिका मिळावी, म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी सतत प्रयत्न करत होते. त्यांच्या पदामुळे त्यांची मागणी लवकर मान्य होऊन तीन वर्षांपासून गुजरात राज्यातील केंद्र निवडणार्या विद्यार्थ्यांना वरील परीक्षेत गुजराती शब्दांसह गुजराती प्रश्नपत्रिका मिळू लागली आहे. मी त्या मानाने लहान कार्यकर्ता असून मनात असलेली तळमळ सोडून इतर काही सामर्थ्य नसल्याने मराठी शब्दांसह मराठी प्रश्नपत्रिका मिळावी ही माझी मागणी तीन वर्षे उशिरा मान्य झाली.
आजपर्यंत ८५ विद्यार्थ्यांनी मराठीचा पर्याय निवडला. लवकरच ही संख्या वाढेल. या परीक्षेसाठी सध्या मराठी पुस्तके नाहीत टी पुढील वर्षी मी उपलब्ध करून देणार आहे. - मराठीकाका,अनिल गोरे
आजपर्यंत ८५ विद्यार्थ्यांनी मराठीचा पर्याय निवडला. लवकरच ही संख्या वाढेल. या परीक्षेसाठी सध्या मराठी पुस्तके नाहीत टी पुढील वर्षी मी उपलब्ध करून देणार आहे. - मराठीकाका,अनिल गोरे
No comments:
Post a Comment